शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

'...त्यावेळी उद्देश जीव वाचविण्याचा होता, स्वत:ची प्रतिमा चमकविण्याचा नव्हता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 20:18 IST

काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले, पण कधी अशी चमकोगिरी केली नाही. 

ठळक मुद्देडॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात एका दिवसात १७ कोटी मुलांना पोलिओचा डोस देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी ना पोस्टर्स होते, ना मोठा प्रचार

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन आठवड्यापूर्वी देशभरात २१ जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार, देशात २१ जून रोजी देशात तब्बल ८० लाख लोकांचे रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे. त्याबद्दल मोदींनी ट्विरवरुन देशवासीयांचे अभिनंदन करत वेल डन इंडिया.. असेही म्हटले आहे. देशाता आता लसीकरणाची मोहीम गतीमान होत आहे. तर, दुसरीकडे जाहिरातबाजी आणि बॅनरबाजीतून मोदी सरकारकडून स्वत:चं कौतुकही होत आहे. त्यावरुन, काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

केंद्र सरकारच्या गतीमान लसीकरण मोहिमेचे आभार मानण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केल्या आहेत. तर, दुसरीकडे वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजीही करण्यात आली आहे. त्यावरुनच, काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशात यापूर्वीही मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले, पण कधी अशी चमकोगिरी केली नाही. 

डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात एका दिवसात १७ कोटी मुलांना पोलिओचा डोस देण्यात आला होता. मात्र, त्यावेळी ना पोस्टर्स होते, ना मोठा प्रचार. कारण उद्देश जीव वाचवण्याचा होता, स्वत:ची प्रतिमा चमकावण्याचा नाही!, असे म्हणत काँग्रेसने मोदींच्या लसीकरणातील जाहीरातबाजीवर टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे ट्विट शेअर केलं आहे.नरेंद्र मोदींचे बॅनर झळकवण्याचे निर्देश  

विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी याबाबत व्हॉटसअपवरुन विविध विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांना रविवारी संदेश पाठवले आणि मोदींचे आभार व्यक्त करणारे फलक सोशल मीडियावरील शैक्षणिक संस्थांच्या वेबपेजवर प्रसिद्ध करावेत, असे सांगितले. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मान्यताप्राप्त डिझाईन हे हिंदी आणि इंग्रजी भाषेतून उपलब्ध असेल आणि ते सोशल मीडियाला जोडावे. या डिझाईनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून 'धन्यवाद पीएम मोदी' असा आशयही लिहिण्यात आला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcongressकाँग्रेसBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या