पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची वेळ आलीय का?; जाणून घ्या, तज्ज्ञ काय म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:58 PM2021-04-27T13:58:24+5:302021-04-27T14:05:18+5:30

national lockdown : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी मिनी लॉकडाऊन तर काही राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे.

Time for a national lockdown to bend Covid curve? Here’s what experts have to say | पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची वेळ आलीय का?; जाणून घ्या, तज्ज्ञ काय म्हणतात...

पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची वेळ आलीय का?; जाणून घ्या, तज्ज्ञ काय म्हणतात...

Next
ठळक मुद्देभारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी मिनी लॉकडाऊन तर काही राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची चर्चा होऊ लागली आहे. यावर तज्ज्ञांचे मत काय आहे? याबाबत 'आजतक'ने वृत्त दिले आहे, ते जाणून घेऊया...  (Time for a national lockdown to bend Covid curve? Here’s what experts have to say)

PHFI बंगळुरूचे प्राध्यापक गिरीधर बाबू यांचे म्हणणे आहे की, देशव्यापी लॉकडाऊन हा पर्याय आहे, असे वाटत नाही. कारण, आपण या व्हायरसचे संक्रमण होण्याच्या पद्धतीला समजू शकत नाही. एपिसेंटर्स काय आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. जसे की कर्नाटकात बंगळुरू आहे, म्हणून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू करणे योग्य होणार नाही. 

याचबरोबर, कंटेन्मेंट झोनही आपण यशस्वी करू शकलो नाही. लॉकडाऊन शहर आणि जिल्हास्तरावर ठिक आहे. कोरोना रुग्णांचे आकडे कसे कमी होतील, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. लॉकडाऊनमुळे केवळ कोरोना रुग्णांच्या संख्येला आवर घालता येईल. पण कंटेन्मेंटमुळे खूप मदत होईल, असे प्राध्यापक गिरीधर बाबू यांनी सांगितले.

('केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील', सोनिया गांधींची टीका )

'लसीकरण मोहिमेचा वेग कमी होऊ शकतो'
लॉकडाऊन आपल्याला तयारीसाठी वेळ देतो, मात्र लॉकडाऊनसाठी सुद्धा तयारीची आवश्यकता आहे.आता ऑक्सिजनची दुप्पट मागणी वाढली आहे. कर्नाटकमध्ये लॉकडाऊनचा एक मोठा संकेत सुद्धा आहे. लॉकडाऊनच्या काळात लसीकरण मोहिमेचा वेग कमी होऊ शकतो. त्यामुळे रणनीतीमध्ये बदल आवश्यक आहे, असे कर्नाटक कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. विशाल राव यांचे मत आहे.

(CoronaVirus : 'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता)

लॉकडाऊनचा थेट परिणाम 'या' कामगारांवर पडतो
नवी दिल्लीतील डॉ. शाहीद जमील यांचे म्हणणे आहे की, देशव्यापी लॉकडाऊन लागू केल्यामुळे काही उपयोग होणार नाही. ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी निर्बंध असले पाहिजे. देशव्यापी लॉकडाऊन केल्याने काय परिस्थिती निर्माण झाली होती. हे आपण पाहिलेच आहे. अशा वेळी लोकांच्या रोजी रोटीकडेही लक्ष दिले पाहिजे. लॉकडाऊनचा थेट परिणाम रोजंदारी करणाऱ्या कामगारांवर पडतो. याचबरोबर, देशात लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. त्यातच नवा स्ट्रेन वेगाने पसरत आहे. यावेळी आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पसरला आहे, असेही डॉ. शाहीद जमील यांनी सांगितले.

(Coronavirus : ...म्हणून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला, CSIR नं सांगितलं कारण)

'लोकल लॉकडाऊनमुळे कोरोनाची चेन तोडली जाईल'
गेल्यावेळी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यावेळी कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. लॉकडाऊन करण्याचीही एक पद्धत आहे. परंतु सरकारकडे लोकांना दिलासा देण्याचा दुसरा पर्याय नाही. लोकल लॉकडाऊनमुळे कोरोनाची चेन तोडली जाईल, यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे, असे मुंबईच्या केअर रेटिंग्सचे चीफ इकनॉमिस्ट मदन सबनवीस यांनी सांगितले.

("तीन प्रकारात विभागला 'डबल म्यूटेंट' व्हायरस", जाणून घ्या संपूर्ण माहिती...)

दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ नवे रुग्ण तर २७७१ मृत्यूंची नोंद झाली. दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ३२ हजार ५५५ ने वाढले आहे. दिवसभरात २,५१,८२७ रुग्ण बरे झाले आहेत.
 

Web Title: Time for a national lockdown to bend Covid curve? Here’s what experts have to say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.