tik tok star mohit killed in najafgarh | धक्कादायक! TikTok स्टार जिम ट्रेनरची गोळ्या घालून हत्या
धक्कादायक! TikTok स्टार जिम ट्रेनरची गोळ्या घालून हत्या

ठळक मुद्देटिक टॉकवर तब्बल 5 लाख फॉलोअर्स असलेल्या एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील नजफगड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मोहित मोर असं या 27 वर्षीय स्टार जिम ट्रेनरचं नाव असून त्याची हत्या करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - टिक टॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिक टॉकवर तब्बल 5 लाख फॉलोअर्स असलेल्या एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील नजफगड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मोहित मोर असं या 27 वर्षीय स्टार जिम ट्रेनरचं नाव असून त्याची हत्या करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित मोर हा टिक टॉकवर अत्यंत लोकप्रिय होता. त्याचे 5.17 लाख फॉलोअर्स होते. द्वारका येथे गँगवॉर झालं यामध्येच मोहितची हत्या झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी साडे चारच्या दरम्यान मोहित आपल्या मित्रांना भेटण्यासाठी फोटो स्टेटच्या दुकानात गेला होता. त्याचवेळी गुंडांनी या दुकानावर हल्ला करत मोहितवर गोळ्या झाडल्याचं समोर आलं आहे. 

द्वारका येथे घडलेल्या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये गोळीबारानंतर गुंड पळून जाताना दिसत आहेत. मोहित विरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.  मोहितचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेत आहेत. याप्रकरणी नजफगढ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहित मोर हा मूळचा हरयाणाचा असून नजफगडमध्ये तो एकटाच राहत होता. टिक टॉकमुळे तो काही दिवसातच सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला. मोहितचं कुटुंब हरयाणातील बहादूरगड येथे आहे. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबात मोठा भाऊ आणि आई आहे. मोहितची जिम ही त्याच्यामुळेच लोकप्रिय झाली होती. सोशल मीडियावर त्याला असलेल्या प्रसिद्धीमुळे आजुबाजूच्या लोकांना त्याच्याबद्दल थोडा आकस होता. त्यातून वैर निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. 

मोहितचे टिक टॉकवर तब्बल 5 लाख फॉलोअर्स 

टिक टॉकवर हा अत्यंत लोकप्रिय होता. त्याचे तब्बल 5 लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर देखील मोहितचे 3 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. मोहित एक जिम ट्रेनर होता. त्याचा बिनधास्त लूक लोकांना खूपच आवडला होता. 

 


Web Title: tik tok star mohit killed in najafgarh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.