The tiger has returned ... Cobra Commando freed from the clutches of Naxals | वाघ परतला... नक्षलवाद्यांच्या तावडीतील कोब्रा कमांडोची सुटका

वाघ परतला... नक्षलवाद्यांच्या तावडीतील कोब्रा कमांडोची सुटका

ठळक मुद्देबंदी घालण्यात आलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांनी एक निवेदन जारी केले आहे की, ३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीपासूनच बेपत्ता जवान त्यांच्या ताब्यात आहे.

बीजापूर: छत्तीसगडमध्येनक्षलवादी हल्ल्यादरम्यान नक्षलवाद्यांनी पकडलेल्या सीआरपीएफ कमांडोला सोडण्यात आले आहे. यापूर्वी नक्षलवाद्यांनी दोन पानांचे निवेदन जारी करून सीआरपीएफचे कोब्रा कमांडो राकेश्वर सिंग मनहास त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. बंदी घालण्यात आलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांनी एक निवेदन जारी केले आहे की, ३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीपासूनच बेपत्ता जवान त्यांच्या ताब्यात आहे. राज्य सरकारने चर्चेसाठी मध्यस्थ करणार असल्याचं जाहीर केल्यानंतरच सीआरपीएफ कमांडो सोडण्यात येणार असल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले.बुधवारीच नक्षलवाद्यांनी कमांडो राकेश्वर सिंग मनहास यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आणि सांगितले की, मनहास सुखरूप आहेत. फोटोत राकेश्वर सिंग मनहास ताडाच्या पानांच्या बनवलेल्या झोपडीत बसलेला दिसत होता. राकेश्वर सिंग मनहासच्या फोटोची माहिती सीआरपीएफने दिली होती. फोटोत राकेश्वर सिंह एकदम निरोगी आणि सुखरूप दिसत होता. बुधवारी दिवसभर नक्षलवाद्यांनी हे छायाचित्र प्रसिद्ध केले.

मंगळवारी छत्तीसगडमधील लक्षलवाद्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुकमा व विजापूर सीमावर्ती भागात शनिवारी चकमकीनंतर बेपत्ता झालेल्या सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचा एक सैनिक त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यांनी जवानाला सोडण्यासाठी सरकारकडे विचारणा केली असता मधला मार्ग काढण्याची  मागणी करण्यात आली. ३ एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सीआरपीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमकी झाली आणि त्यामध्ये २२ सैनिक शहीद झाले आणि नक्षलवाद्यांनी सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंग मनहास यांचे अपहरण केले. नंतर नक्षलवाद्यांनी हा मेसेज पाठवला होता की, कमांडो पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आज नक्षलवाद्यांनी कमांडो राजेश सिंग मनहासचा फोटो जाहीर केला आहे. फोटोत राकेश्वर सिंग मनहास ताडाच्या पानांपासून बनलेल्या झोपडीत बसलेला दिसत आहे. सीआरपीएफने राकेश्वर सिंग मनहासच्या चित्राबाबत दुजोरा दिला आहे. मात्र, राकेश्वर यांच्या सुटकेसाठी नक्षलवाद्यांनी जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी अट ठेवली होती. 

बेपत्ता जवान राकेश्वर सिंग मनहासचा फोटो नक्षलवाद्यांनी शेअर करत सुटकेसाठी ठेवली अनोखी अट 

 

Chhattisgarh Naxal Attack : शहीद झालेला जवान लग्नाच्या 19 वर्षांनी होणार होता 'बाप' पण...; मन हेलावून टाकणारी घटना

 

नक्षलवादी हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पतीला सुखरूप परत आणा;पत्नीने पंतप्रधान, गृहमंत्र्यांना घातलं साकडं

या फोटोत राकेश्वर सिंग उत्तम प्रकारे निरोगी दिसत आहे. नक्षलवाद्यांनी हे फोटो काही आधी जाहीर केले होते. छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना फोन करुन बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्याची सुटका करायची असल्यास एक अट समोर ठेवली आहे. या अटीनुसार जवानाने सुटकेनंतर सुरक्षा दलात काम करु नये. ही नोकरी सोडून इतर कोणतंही काम करावं, अशी अट नक्षलवाद्यांनी ठेवली होती. त्यानंतर सरकारने मध्यस्थ करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर जवानाला सोडण्यात आलं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The tiger has returned ... Cobra Commando freed from the clutches of Naxals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.