IRCTC वरून तिकिट बुकिंसाठी Aadhaar, PAN अनिवार्य होण्याची शक्यता, रेल्वेकडून योजनेवर काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 20:52 IST2021-06-26T20:50:37+5:302021-06-26T20:52:48+5:30
IRCTC Aadhaar PAN Linking : आयडेंटिटी डॉक्युमेंट्स लिंक करण्यासाठी काम सुरू असल्याची आरपीएन डायरेक्टर यांची माहिती. तिकिटांच्या नावाखाली प्रवाशांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी निर्णय.

IRCTC वरून तिकिट बुकिंसाठी Aadhaar, PAN अनिवार्य होण्याची शक्यता, रेल्वेकडून योजनेवर काम
ऑनलाईन ट्रेन तिकिट बुक करण्यासाठी आता आधार कार्ड आणि पॅन कार्डासाररखे डॉक्युमेंट्स लिंक करण्याची गरज भासू शकते. रेल्वेनंतिकिटांच्या नावावर होणारी फसवणूक थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्याचा विचार केला आहे. रेल्वेची ही योजना लागू झाली तर प्रवाशांना IRCTC च्या वेबसाईट किंवा अॅपद्वारे तिकिट बुक करण्यासाठी लॉग इन करतेवेळी आधार, पॅन किंवा पासपोर्ट क्रमांक टाकावा लागू शकतो.
रेल्वे आयआरसीटीसीशी आयडेंटीटी डॉक्युमेंट्स जोडण्याच्या योजनेवर काम करत असल्याची माहिती आपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी शुक्रवारी दिली. "यापूर्वी फसवणुकीबद्दल जी कारवाई होत होती ती ह्युमन इंटेलिजन्सवर आधारित होती. परंतु त्याचा परिणाम तितका दिसत नव्हता. आम्ही अशा घटनांच्या विरोधात काम करत आहोत. तिकिट बुक करताना लॉग इनसाठी पॅन, आधार किंवा दुसऱ्या ओळखपत्रांना लिंक करावं लागेल असं आम्हाला वाटत आहे. यामुळे आम्ही दुसऱ्या प्रवाशांची होणारी फसवणूक थांबवू शकू," असं त्यांनी नमूद केलं.
आधारसोबत रेल्वेचं काम पूर्ण
"यासाठी आम्हाला एक नेटवर्क तयार करावं लागेल. आम्ही आधार अथॉरिटीजसोबत काम पूर्ण केलं आहे. लवकरच आम्ही अन्य ओळखपत्रांसोबतही काम पूर्ण करू. हे काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही याचा वापर करणं सुरू करू. ऑक्टोबर नोव्हेंबर २०१९ पासून सुरू केलेल्या मोहिमेनंतर १४,२५७ दलालांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत २८.३४ कोटी रूपयांची बनावट तिकिटं पकडण्यात आली आहेत. तक्रारी दाखल करण्यासाठी रेल्वे सुरक्षा अॅप विकसित करण्यात आलं आहे. रेल्वे सुरक्षा मजबूत ठेवण्यासाठी आरपीएफच्या व्यवस्थेत मजबूती आणली आहे. ६०४९ स्टेशन्स आणि सर्व पॅसेंजर्स ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील," असंही अरूण कुमार म्हणाले.