मतदानासाठी लागणार अंगठ्याचे ठसे ?

By Admin | Updated: March 8, 2015 14:05 IST2015-03-08T14:03:53+5:302015-03-08T14:05:44+5:30

बोगस मतदानावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून मतदानात मतदारांच्या अंगठ्याचे ठसे बंधनकारक करण्याची तयारी सुरु केली आहे.

Thumb impression for voting? | मतदानासाठी लागणार अंगठ्याचे ठसे ?

मतदानासाठी लागणार अंगठ्याचे ठसे ?

>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि.  ८ - बोगस मतदानावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील मतदानात मतदारांच्या अंगठ्याचे ठसे बंधनकारक करण्याची तयारी सुरु केली आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बायोमेट्रीक मशिन्सही लावल्या जाणार आहेत.
निवडणुकीतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासोबतच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. यानुसार  २०१९ च्या प्रस्तावित लोकसभा निवडणुकीतील मतदानादरम्यान मतदारांच्या अंगठ्याचे ठसे घेण्याची तयारी आयोगाने सुरु केली आहे अशी माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली. याशिवाय १५ ऑगस्टपर्यंत मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचे कामही सुरु होईल असे अधिका-यांनी नमूद केले. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदारांना एसएमएसद्वारे मतदान केंद्राची माहिती देण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. 

Web Title: Thumb impression for voting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.