नवी दिल्ली/पुणे : राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारा (एनटीए) अभियांत्रिकीच्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई-मेन) निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात २४ विद्यार्थ्यांनी १०० एनटीए स्कोअर प्राप्त केला आहे. त्यात महाराष्ट्रातील आयुष रवी चौधरी, सानिध्या सराफ आणि विशाद जैन या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दोन मुलींनीही पैकीच्यापैकी स्कोर मिळवला.
पूर्ण १०० एनटीए स्कोअर मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांत सर्वाधिक सातजण राजस्थानचे आहेत. तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी ३, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि गुजरातचे प्रत्येकी २ आणि कर्नाटक व आंध्र प्रदेशातील प्रत्येकी १ विद्यार्थी यात आहे.
पहिल्या सत्रातील परीक्षार्थी - १०.६१ लाख दुसऱ्या सत्रातील परीक्षार्थी - ९.९२ लाख
अव्वल आलेल्यांपैकी २१ जण सामान्य श्रेणीतील आहेत. प्रत्येकी १ जण एससी, एसटी व ओबीसी वर्गातील आहेत. जेईई-मेन पेपर-१ व पेपर-२ च्या स्कोअरनुसार जेईई-ॲडव्हान्स्डसाठी विद्यार्थ्यांना पात्र ठरविले जाईल.