शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

गुजरातनंतर आता उत्तरप्रदेशात राजकीय उलथापालथ, तीन आमदारांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 14:20 IST

बिहार, गुजरातनंतर आता उत्तरप्रदेशमध्ये राजकारणात उलथापालथ सुरु झाली आहे. स

ठळक मुद्दे बिहार, गुजरातनंतर आता उत्तरप्रदेशमध्ये राजकारणात उलथापालथ सुरु झाली आहे.बुक्कल नवाबने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले

लखनऊ, दि. 29 - बिहार, गुजरातनंतर आता उत्तरप्रदेशमध्ये राजकारणात उलथापालथ सुरु झाली आहे. समाजवादी पक्षाच्या विधानपरिषेदतील तीन आणि मायावतींच्या विधानपरिषदेतील एका सदस्याने आमदारकीचा राजीनामा दिला आहे. समाजवादी पक्षातील  बुक्कल नवाब, मधुकर जेटली, यशवंत सिंह या तिघांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार महिन्यांनी या घडामोडी घडत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज उत्तरप्रदेश दौ-यावर येणार आहेत. त्याआधी या राजकीय घडामोडी घडत आहेत. 

राजीनामा दिल्यानंतर बुक्कल नवाबने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करुन भाजपामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. मार्च महिन्यात उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला होता. 403 सदस्यांच्या उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाचे 300 पेक्षा जास्त आमदार निवडून आले. 

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबरोबर काम करु शकत नाही. पक्ष एक लढाईचा अखाडा बनला आहे असे बुक्कल नवाब यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले. या तीन राजीनाम्यांमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा विधिमंडळात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आदित्यनाथ गोरखपूर येथून तर, मौर्य फुलपूरमधून लोकसभेचे खासदार आहेत. 

बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी भाजपावर कडाडून टीका केली आहे. भाजपाला सत्तेची भूक असून त्यापायी  त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मणिपूर, गोवा, बिहार, गुजरात आणि आता उत्तरप्रदेशात जे घडले त्यावरुन भाजपापासून लोकशाहीला धोका असल्याचे सिद्ध होते असे मायावती म्हणाल्या. 

गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणा-या निवडणुकीपूर्वीच  काँग्रेस पार्टीमध्ये भगदाड पडायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत गुजरातमधील काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पार्टीला अधिक फटका बसू नये व फुटीची शक्यता ओळखून काँग्रेसनं आपल्या 44 आमदारांना विमानाने बंगळुरू येथे पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे. या 40 आमदारांना राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत बंगळुरूमधील एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे.  काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होऊ नये, यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.