शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात पटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 3 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 11:28 AM

या स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कोलकाता:पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सतगाचिया विधानसभा क्षेत्रातील बजबाज परिसरात बुधवारी सकाळी अवैधरित्या सुरू असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरुन गेला. या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाल आहे, तर काहीजण जखमी आहेत. मृतांमध्ये मालक असीम मडा, त्याची मावशी आणि एका मजुराचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोक जागे झाले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 8.15 च्या सुमारास बजबाज-2 ब्लॉकच्या नोदाखली पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर सुरू असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला.

आवाजाने घराच्या काचा फुटल्यापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका जोरदार होता की, जवळच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तृणमूलचे स्थानिक नेते बुकन बॅनर्जी यांच्यासह नोदाखली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आता कारखान्याच्या मालकाने एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा कसा केला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे फटाके बनवले जातात. याआधीही बेकायदा फटाके बनवताना स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस दल परिसरात तपास करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा या परिसरात कसा पोहोचला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालfire crackerफटाकेBlastस्फोट