शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:51 IST

सोनमनेच राजाचा जीव घेतला असला, तरी यामागे काहीतरी वेगळं कारस्थान होतं, असा दाट संशय राजाच्या कुटुंबाने व्यक्त केला.

राजा रघुवंशी याची मेघालयमध्ये हत्या का करण्यात आली, या प्रश्नाचं उत्तर त्यांचं कुटुंब आजही शोधत आहे. सोनमनेच राजाचा जीव घेतला असला, तरी यामागे काहीतरी वेगळं कारस्थान होतं, असा दाट संशय राजाच्या कुटुंबाने व्यक्त केला. यासाठी त्यांनी सोनमची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. शिलाँग पोलिसांनी नार्को टेस्टची मागणी योग्य नसल्याचं म्हटलं असलं तरी, कुटुंबीय या मागणीवर ठाम आहेत. राजाच्या हत्येमागे मोठं रहस्य असू शकतं, जे नार्को टेस्टने समोर येऊ शकतं, असं त्यांना वाटत आहे. आता राजाच्या कुटुंबीयांनी यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

नार्को टेस्टसाठी वकिलांची नियुक्तीसूत्रांनुसार, राजाच्या कुटुंबीयांनी शिलाँग ते दिल्लीपर्यंत खटला लढण्यासाठी तीन वकिलांची नियुक्ती केली आहे. लवकरच शिलाँग उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली जाईल. याव्यतिरिक्त, दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या एका वकिलाशीही संपर्क साधण्यात आला आहे. जर उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयात ही मागणी केली जाऊ शकते. 

राजा रघुवंशीचा भाऊ वारंवार नार्को टेस्टची मागणी करत आहे. मात्र, शिलाँग पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे आणि हत्येशी संबंधित सर्व महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत, त्यामुळे नार्को टेस्टची आवश्यकता नाही.

लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनंतर घडला प्रकारसोनम रघुवंशी आणि राज यांच्यासह सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. इंदूरच्या सोनम आणि राजाचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. अवघ्या १० दिवसांनंतर ते दोघे हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. इथे २३ मे रोजी ते दोघे अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह एका खड्ड्यात सापडला. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सोनमने अचानक उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे आत्मसमर्पण केले.

आतापर्यंतच्या तपासानुसार, शिलाँग पोलिसांचे म्हणणे आहे की, राज आणि सोनमने राजाच्या हत्येचा कट रचला होता. सोनम राजच्या प्रेमात होती आणि कुटुंबाने तिचं लग्न राजाशी लावून दिलं होतं. राजच्या तीन मित्रांच्या मदतीने सोनमने हनिमूनदरम्यान राजाची हत्या करवून घेतली. परंतु ,राजाच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, यामागचं कारण एवढंच नसावं. जर सोनमला राजशी लग्न करायचं नव्हतं, तर तिने नकार का दिला नाही? ती राजाला सोडून पळून जाऊ शकली असती? पण तिने हत्या करण्याचा निर्णय का घेतला? हे प्रश्न आजही राजाच्या कुटुंबीयांना सतावत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू