मध्य प्रदेशात दोन मालगाड्यांच्या टकरीत तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:38 IST2020-03-02T06:38:47+5:302020-03-02T06:38:58+5:30

कोळशाने भरलेल्या मालगाडीची दुसऱ्या एका रिकाम्या मालगाडीशी रविवारी सकाळी जोरदार टक्कर झाल्याने तिघांचा मृत्यू झाला.

Three killed in two car collisions in Madhya Pradesh | मध्य प्रदेशात दोन मालगाड्यांच्या टकरीत तीन जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशात दोन मालगाड्यांच्या टकरीत तीन जणांचा मृत्यू

सिंगरौली (म. प्र.) : येथून जवळच कोळशाने भरलेल्या मालगाडीची दुसऱ्या एका रिकाम्या मालगाडीशी रविवारी सकाळी जोरदार टक्कर झाल्याने तिघांचा मृत्यू झाला. ही टक्कर एवढी भीषण होती की, त्याने कोळशाच्या मालगाडीचे इंजिन पूर्ण चेपून गेले. मरण पावलेले तिघेही या इंजिनात बसलेले होते. गॅस कटरने इंजिनाचा पोलादी पत्रा कापून दुपारपर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
ही मालगाडी ‘एनटीपीसी’च्या औष्णिक वीज केंद्रासाठी कोळसा घेऊन चालली होती. वीज केंद्रात कोळशाच्या मालगाड्या नेण्यासाठी येणारे व जाणारे स्वतंत्र रेल्वेमार्ग आहेत. टक्कर समोरासमोर झाली नाही, तर एक गाडी दुसरीवर बाजूने धडकली. तरीही टक्कर होईपर्यंत या दोन्ही गाड्या त्या दिशेने कशा गेल्या याचा तपास करण्यात येत आहे. 

Web Title: Three killed in two car collisions in Madhya Pradesh