शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

PMOमध्ये तीन IAS अधिका-यांवर मोठी जबाबदारी; जाणून घ्या, मोदींसाठी का आहेत विशेष?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 10:22 IST

मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी रघुराज राजेंद्रन यांना पीएमओमध्ये संचालक आणि आंध्र प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आम्रपाली काटा यांना उपसचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली.

पंतप्रधान कार्यालयात तीन IAS अधिका-यांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती(ACC)ने तिघांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे. यात उत्तराखंडच्या टिहरीचे डीएम मंगेश घिल्डियाल देखील आहेत. त्यांना पीएमओमध्ये अव्वर सचिव पदावर नियुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणात वैयक्तिक आणि प्रशिक्षण विभागाने उत्तराखंडच्या मुख्य सचिवांना 12 सप्टेंबरला एक पत्र पाठविले. त्याशिवाय मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी रघुराज राजेंद्रन यांना पीएमओमध्ये संचालक आणि आंध्र प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आम्रपाली काटा यांना उपसचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली.PMOमध्ये टिहरीचे डीएम कर्तव्यावरघिल्डियाल हे यापूर्वी रुद्रप्रयाग जिल्ह्याचे डीएम होते आणि ते केदारनाथच्या पुनर्बांधणी आणि चार धाम रोडच्या बांधकामाशी संबंधित काम पाहत होते. हे दोन्ही प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले. रुद्रप्रयागमध्ये जाण्यापूर्वी घिल्डियाल हे बागेश्वरचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम करत होते.मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी रघुराज राजेंद्रनत्याचप्रमाणे मध्य प्रदेश केडरच्या 2004  बॅचचे रघुराज राजेंद्रन यांची पीएमओमध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायूचे खासगी सचिव आणि पोलाद कॅबिनेट मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली स्टील मंत्रालयात काम केले आहे.आंध्र प्रदेश केडर अधिकारी आम्रपाली काटाआम्रपाली काटा आंध्र प्रदेश केडरच्या 2010च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. पीएमओमध्ये त्यांची उपसचिवपदी नियुक्ती झाली आहे. त्या कॅबिनेट सचिवालयात उपसचिव होत्या. एसीसीचे अध्यक्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर गृहमंत्री अमित शहा हे सदस्य आहेत.