एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 18:02 IST2018-03-28T18:02:37+5:302018-03-28T18:02:37+5:30
एअर इंडियाच्या दिल्लीहून कोलकाता जाणा-या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर दिल्ली-कोलकाता एआय-020 हे विमान दिल्लीत उतरवण्यात आलं आहे.

एअर इंडियाच्या दिल्ली-कोलकाता विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनं खळबळ
नवी दिल्ली- एअर इंडियाच्या दिल्लीहून कोलकाताला जाणा-या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. धमकी मिळाल्यानंतर दिल्ली-कोलकाता एआय-020 हे विमान दिल्लीत उतरवण्यात आलं आहे. विमान रिकामी केल्यानंतर सुरक्षेखातर त्याची तपासणी केली जातेय. तर नोव्हेंबर 2017मध्येही गो एअरच्या विमानात बॉम्ब असल्याची अफवा समजल्यानंतरही ते विमान आपत्कालीन स्थितीत कोलकाता विमानतळावर उतरवण्यात आलं होतं.