लंकेची मच्छीमारांना धमकी

By Admin | Updated: March 8, 2015 03:02 IST2015-03-08T03:02:54+5:302015-03-08T03:02:54+5:30

श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घातल्या जातील, असे विधान करून श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी नवा वाद निर्माण केला

Threatens to Lanka fishermen | लंकेची मच्छीमारांना धमकी

लंकेची मच्छीमारांना धमकी

हद्दीत आलात तर गोळ्या घालू ! : मोदींच्या श्रीलंका दौऱ्याआधी नवा वाद
कोलंबो : श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घुसल्यास भारतीय मच्छीमारांना गोळ्या घातल्या जातील, असे विधान करून श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी विक्रमसिंघे यांनी हे विधान केले.
ते तमिळ थांती टीव्हीशी बोलत होते. भारतीय मच्छीमारांनी श्रीलंकेच्या उत्तरेतील मच्छीमारांची उपजीविका हिसकावल्याचा आरोप करताना ते म्हणाले की, जर कोणी आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर मी गोळी घालू शकतो. मग भलेही यात समोरचा मारला जाऊ द्या. कायदा आम्हाला असे करण्याची मुभा देतो. मच्छीमारांच्या मुद्द्यावर ते म्हणाले, की माझ्या माहितीनुसार, आमच्या सीमारेषा बळकट आहेत. हे आमचे सागरी क्षेत्र आहे.
जाफनाच्या मच्छीमारांना तेथे मासेमारी करू दिली पाहिजे. आम्ही त्यांना मासेमारी करण्यापासून रोखले. त्यामुळे ते आता तोडगा काढण्यास तयार झाले. तोडग्याला आक्षेप नाही. सन्मानजनक तोडगा निघायला हवा; मात्र श्रीलंकेच्या उत्तर भागातील मच्छीमारांच्या उपजीविकेच्या किमतीवर अशा प्रकारचा तोडगा मान्य नाही. (वृत्तसंस्था)

चर्चेतून मार्ग काढायला हवा...
च्श्रीलंकन लष्कराने केलेल्या गोळीबारात गेल्या वर्षी ६०० भारतीय मारले गेल्याच्या आरोपांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की अलीकडे अशी घटना घडलेली नाही.
च्श्रीलंकेच्या लष्कराने भारतीय मच्छीमारांवर गोळीबार करण्याची शेवटची घटना २०११ मध्ये झाली होती. यातील अनेक घटना श्रीलंकेतील यादवीदरम्यान घडल्या होत्या. यातील काही लोक
हे शस्त्रांच्या पुरवठ्यात सहभागी होते, असे विक्रमसिंघे म्हणाले.
च्उत्तरेकडील मच्छीमार आजही आम्हाला विचारतात, की श्रीलंकन नौदल आमचे रक्षण का करीत नाही? आम्ही आमच्या मच्छीमारांना आमची सागरीसीमा कोणती आहे, हे समजावून सांगायला हवे. आम्ही भारताशी चर्चा करून यातून मार्ग काढायला हवा.

हा मानवीय मुद्दा, स्वराज यांची शिष्टाई
लंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालण्याच्या वादग्रस्त विधानानंतर मच्छीमारांच्या अधिकाराबाबतचा मानवीय मुद्दा शनिवारी श्रीलंकेकडे उपस्थित केला. पंतप्रधान मोदी यांच्या पुढील आठवड्यातील दौऱ्यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इटालियन खलाशी व भारतीय मच्छीमारांच्या मुद्द्याची तुलनाच होऊ शकत नाही, असेही लंकन पंतप्रधानांना स्पष्ट सांगितले.

श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान स्वराज यांनी भारतीय मच्छीमारांशी संबंधित मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा मानवीय मुद्दा असल्याचा दृष्टिकोन त्यांनी मांडला. हा उपजीविकेचा मुद्दा आहे, असेही त्या म्हणाल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांना सांगितले. इटालियन खलाशांनी तामिळनाडूच्या दोन मच्छीमारांना चाचे समजून ठार केले होते.

भारतीय मच्छीमार आणि इटालियन खलाशांच्या मुद्द्याचा परस्पर संबंध जोडण्याच्या श्रीलंकेच्या प्रयत्नाबाबत छेडले असता अकबरुद्दीन म्हणाले, की असा संबंध जोडताच येत नाही. हे दोन्ही मुद्दे वेगळे आहेत. आमच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावरील आमचा दृष्टिकोन तत्काळ श्रीलंकन पंतप्रधानांना सांगितला.

श्रीलंकेकडून ८६ मच्छीमारांना अटक
भारतीय मच्छीमारांनी श्रीलंकन हद्दीत मासेमारी करण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ते आमच्या हद्दीत काय करीत आहेत? त्यांनी त्यांच्या हद्दीत मासेमारी करावी आणि आमच्या मच्छीमारांना आमच्या हद्दीत मासेमारी करू द्यावी, असेही ते म्हणाले. त्यामुळे समस्या उद्भवणार नाही अन्यथा आमच्या नौदलावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करू नये, असे ते म्हणाले. इटालियन खलाशांचा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले, की जर भारत इटलीचा मित्र आहे तर त्याने इटलीबाबतही तीच उदारता दाखवायला हवी, जी त्याला आमच्याकडून अपेक्षित आहे, असेही विक्रमसिंघे म्हणाले. श्रीलंकेच्या लष्कराने गेल्या महिन्यात ८६ मच्छीमारांना अटक करून त्यांच्या १० नावा जप्त केल्या होत्या.

Web Title: Threatens to Lanka fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.