शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

"खरं बोलणाऱ्यांना धमकावलं जातंय"; न्यायमूर्ती यादवांना पाठिंबा, योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:35 IST

इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. 

Yogi Adityanath on shekhar kumar yadav statement: न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला पाठिंबा देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (१६ डिसेंबर) विरोधकांवर हल्ला चढवला. उत्तर प्रदेश विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की, एका न्यायाधीश खरं बोलले तर त्यांना काही लोक धमकवायला लागले आणि हे लोक स्वतःला लोकशाहीवादी मानतात. विरोधकांनी न्यायमूर्ती यादव यांच्याविरोधात आणलेल्या महाभियोग प्रस्तावावरही योगींनी टीका केली. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "भारत एक असा देश आहे, जिथे बहुसंख्याक समाज फक्त समान नागरी कायद्याची मागणी करत आहे. अशी मागणी करणे काही चुकीचे नाही. विरोधक सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी समान नागरी कायदा आणण्याची मागणी केली, तर विरोधकांनी त्यांच्याविरोधात महाभियोगाची नोटीस दिली."

योगी आदित्यनाथ म्हणाले की, "इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी एक गोष्ट मांडली. समान नागरी कायदा असायला हवा आणि जगभरात बहुसंख्याक समाजाच्या भावनांचा सन्मान केलाच जातो. कुणी खरं बोलत असेल, तर तो गुन्हा ठरतोय", अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर केली.  

न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी काय केलं होतं विधान?

विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती शेखर कुमार यादव म्हणालेले की, "हे म्हणण्यात कसलाही कमीपणा नाही की हा हिंदुस्थान आहे. हिंदुस्थानात राहणाऱ्या बहुसंख्याकानुसार हा देश चालेल. हाच कायदा आहे. तुम्ही असे म्हणू शकत नाही की, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असून, तुम्ही हे बोलत आहात. कायदा तर बहुसंख्याकाच्या मताने चालतो. कुटुंबात बघा, समाजात बघा. जास्त लोक जे म्हणतात, तेच स्वीकारलं जातं", असे मत यादव यांनी मांडले होते. 

याच विधानानंतर न्यायमूर्ती शेखर यादव यांच्याविरोधात संसदेत महाभियोग चालवण्याची नोटीस देण्यात आली आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशHigh Courtउच्च न्यायालयcongressकाँग्रेसBJPभाजपा