शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

...या लोकांसाठी ओसामा बिन लादेन शांतीदूत - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 6:17 PM

पुलवामा हल्ल्याला जे लोक अपघात बोलतात, ते लोक दहशतवादी ओसामा बिन लादेनला शांतीदूत मानतात असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या दिग्विजय सिंह यांच्यावर केला.

धार - पुलवामा हल्ल्याला जे लोक अपघात बोलतात, ते लोक दहशतवादी ओसामा बिन लादेनला शांतीदूत मानतात असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्यादिग्विजय सिंह यांच्यावर केला. मंगळवारी मध्यप्रदेशातील धार येथे भारतीय जनता पार्टीकडून विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोदी यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढविला. 

गेल्या काही दिवसांपासून पुलवामा हल्ल्याचे राजकारण होताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेत्यांकडून एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याचा पुरावा देण्याची मागणी केली गेली त्या पार्श्वभुमीवर मोदी यांनी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. ज्या पक्षाने इतकी वर्षे देशावर राज्य केले. ज्या पक्षाच्या नेत्याने आपल्या पराक्रमी सैन्याचे हात बांधून ठेवले त्यांचेच नेते आज सैन्याच्या शौर्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्याच पक्षाचे मध्यप्रदेशातील महाशय नेते यांना पुलवामा हल्ला फक्त अपघात वाटतो अशी टीका मोदी यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर नाव न घेता केली. 

यापुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, या लोकांची मानसिकता देशातील लोकांनी समजून घ्यावी, दहशतवाद्यांना वाचविण्यासाठी यांचे नेते पुलवामा हल्ल्याला अपघात बोलतात. पुलवामामध्ये जे झाले तो अपघात होता का असा सवाल त्यांनी उपस्थित लोकांना केला. त्याचसोबत देशातील एका घराण्याचे ते शिलेदार आहेत त्यांना ओसामा बिन लादेनही शांतीदूत वाटतो. या महाशयांनी 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला त्यातूनही पाकिस्तानला क्लीनचीट देत चौकशी भरकटविण्याचे काम केले. 

 

दिल्लीच्या बाटला हाऊस एनकाऊंटरचा हवाला देत मोदी यांनी काँग्रेसवर प्रहार केले. काँग्रेसकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई होऊ शकते अशी अपेक्षी करू शकतो का असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मोदी पुढे म्हणाले की, आज हे लोक सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवर शंका उपस्थित करत आहेत, ज्यावेळी यांचे केंद्रात सरकार होते त्यावेळी दहशतवादी हल्ले झाले तरी ते गप्प बसून राहत होते. एअर स्ट्राईक पाकिस्तानात झाली मात्र त्याचे दुख: भारतातील काही लोकांना झाले असा आरोप मोदी यांनी केला. 

पाकिस्तानी टीव्हीवरचे हे पोस्टर बॉय 

विरोधी पक्षातील लोकांचे चेहरे पहा, मागील काही दिवसांपासून यांचे चेहरे पडलेले दिसत आहेत जसे यांच्यावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. आपल्या फायद्यासाठी पाकिस्तानची भाषा हे बोलत होते. मोदीला शिव्या दिल्याने पाकिस्तानात टाळी वाजते, पाकिस्तानी मिडियात यांचे चेहरे झळकले जातात, सध्या हे लोक पाकिस्तानचे पोस्टर बॉय म्हणून प्रसिध्द झालेत. एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची बोलती बंद झाली, पाकिस्तानचे पितळ उघडे पडले त्यामुळे हे लोक आता समोर येत आहेत. पुरावे मागत आहेत असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाBJPभाजपाcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंह