यंदा भाविकांनी वैष्णोदेवी देवस्थानला अर्पण केले २७ किलो सोने अन् ३ हजार ४२४ किलो चांदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:59 IST2025-03-17T12:58:09+5:302025-03-17T12:59:20+5:30
२०२०-२१ या वर्षात ६३.८५ कोटी रुपये दानात प्राप्त झाले होते. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात वैष्णोदेवी देवस्थानच्या रोख दानात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.

यंदा भाविकांनी वैष्णोदेवी देवस्थानला अर्पण केले २७ किलो सोने अन् ३ हजार ४२४ किलो चांदी
सुरेश एस. डुग्गर -
जम्मू : श्रद्धा आणि आस्थेच्या बाबतीत तिरुपती बालाजी देवस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या माता वैष्णोदेवी देवस्थानला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच देवस्थानच्या दानातही वाढ झाली आहे. असे असले भाविक संख्या आणि दानाच्या बाबतीत वैष्णोदेवी देवस्थान बरेच मागे असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी तिरुपती बालाजी देवस्थानला दानस्वरूपात मिळालेली रक्कम आणि सोने-चांदीच्या दानाचे आकडे यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले होते.
२०२०-२१ या वर्षात ६३.८५ कोटी रुपये दानात प्राप्त झाले होते. त्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात वैष्णोदेवी देवस्थानच्या रोख दानात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
वैष्णोदेवीला सोने-चांदी किती?
वर्ष सोने चांदी
२०२०-२१ ९.०७५ किग्रॅ ७५३.६३० किग्रॅ
२०२१-२२ २६.३५१ किग्रॅ २,४००.७०५ किग्रॅ
२०२२-२३ ३३.२५८ किग्रॅ ३,५७६.५८२ किग्रॅ
२०२३-२४ २३.४७७ किग्रॅ ४,०७२.४८६ किग्रॅ
२०२४-२५ २७.७१७ किग्रॅ ३,४२४.५३८ किग्रॅ
सर्व धातू वितळवून त्यांचे रूपांतर शिक्क्यांमध्ये
माहिती अधिकार कायद्यांतर्गत एका अर्जाला उत्तर देताना बोर्डाने म्हटले की, मिळालेले सर्व धातू अशुद्ध स्वरूपात होते. पिवळा धातू सोन्यासारखा व पांढरा धातू चांदीसारखा दिसतो. हे सर्व धातू वितळवून त्यांचे रूपांतर शिक्क्यांमध्ये करण्यात आले आहे.
देवस्थानाला किती मिळाली रोकड?
२०२०-२१ ६३.८५ कोटी
२०२१-२२ १६६.६८ कोटी
२०२२-२३ २२३.१२ कोटी
२०२३-२४ २३१.५० कोटी
२०२४-२५ १७१.९० कोटी