शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘हा तर हिंदू धर्मावर उघड हल्ला…’, उदयनिधी स्टॅलिन यांच्या ‘त्या’ विधानाला हायकोर्टानं ठरवलं हेट स्पीच   

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:55 IST

Udayanidhi Stalin News: तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी आता मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आणि तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानावरून देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी आता मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी वापरलेली भाषा ही नरसंहाराकडे इशारा करते आणि असं विधान हेट स्पीचच्या श्रेणीत येतं, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे.

याबाबत सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने सांगितले की, जर सनातन धर्माचं पालन करणारे लोक अस्तित्वातच राहत कामा नये, असं म्हटलं गेलं तर त्यासाठी नरसंहार हा योग्य शब्द ठरतो. जर सनातन धर्माला एक धर्म मानलं गेलं, तर असं विधान रिलिजिसाइड अर्थात धर्माच्या विनाशाच्या श्रेणीत येतं, असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं.

कोर्टाने पुढे सांगितलं की, अशा प्रकारची भाषा ही कुठल्याही पद्धतीने का असेना लोकांच्या संहाराच्या दिशेने इशारा करते. त्यामध्ये इकोसाइड, फॅक्टोसाइड आणि कल्चरसाइडसारख्या शब्दांचा समावेश आहे. यावेळी उदयनिधी स्टॅलिन यांनी तामिळ भाषेत वापरलेल्या सनातन ओझिप्पू या शब्दाची व्याख्या करताना कोर्टाने सांगितले की, याचा स्पष्ट अर्थ सांस्कृतिक नरसंहार किंवा संस्कृतीच्या निर्मुलनाशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत मंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टनां हेट स्पीच मानता येणार नाही.

एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानाबाबत सवाल उपस्थित करण्यात आले होते. तसेच उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेलं विधान म्हणजे सनातन धर्माचं पालन करणाऱ्यांविरोधात नरसंहार करण्याचं आवाहन असल्याची टीका केली होती. मात्र नंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी आपलं विधान चुकीच्या पद्धतीने मांडलं गेल्याचा दावा केला होता. त्यावर सुनाावणी करताना कोर्टाने हा निवाडा दिला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Udhayanidhi Stalin's statement on Sanatan Dharma is hate speech: High Court

Web Summary : Madras High Court deems Udhayanidhi Stalin's Sanatan Dharma statement hate speech, hinting at genocide. Court suggests the statement implies cultural annihilation. Stalin claimed misinterpretation.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमHinduहिंदूHigh Courtउच्च न्यायालय