शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

मुलाचा मृत्यू झाल्याचे समजून केळीच्या बुडखात बांधले अन् शरयू नदीत सोडले, 15 वर्षांनंतर घडला चमत्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 10:53 IST

2008 मध्ये राम सुमेर यादव यांनी आपल्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजत, त्याल केळीच्या बुडखात बांधून शरयू नदीत सोडले होते.

देवरिया : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. साधारणपणे 15 वर्षांपूर्वी मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजून कुटुंबियांनी त्याला नदीपात्रात सोडले होते. मात्र तो रविवारी जिवंत परतला. ही घटना भागलपूरमधील मुरासन गावात घडली आहे. येथे 2008 मध्ये राम सुमेर यादव यांनी आपल्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समजत, त्याल केळीच्या बुडखात बांधून शरयू नदीत सोडले होते. पण मुलगा जिवंत परतल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसले. ते देवाचे आभार मानत आहेत.

मुलाला झाला होता सर्पदंश -देवरिया जिल्ह्यातील भागलपूरमधील मुरासोन गावचे रहिवासी असलेले राम सुमेर यादव यांचा मुलगा अंगेश याला 2008 मध्ये सर्पदंश झाला होता. त्या वेळी तो केवळ 10 वर्षांचा होता. अंगेशला सर्पदंश झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर गावाकडील उपचारही केले. मात्र त्याला कसल्याही प्रकारचा आराम मिळाला नाही. यानंतर त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचारही करून घेण्यात आले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सर्व बाजूंनी निराशाच आल्यानंतर, लोकांच्या सांगण्यावरून रामसुमेर यांनी अंगेशला केळीच्या बुडखात बांधून शरयू नदीत सोडून दिले होते.

गारुडी समाज्याच्या वस्ती राहिला - १५ वर्षांनंतर घरी पोहोचलेल्या अंगेशने सांगितल्यानुसार, तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा गारुडी समाजाच्या वस्तीत होता. त्याने तेथे विचारपूस केली असता अमन माळी नावाच्या एका सापाचा खेळ करणाऱ्याने त्याला नदीबाहेर काढून त्याच्यावर काही उपचार केल्याचे समजले. यानंतर तो अमन माळीसोबतच राहू लागला. अमन माळी शेजार-पाजारच्या खेड्यांत जाऊन सापाचे खेळ दाखवत असे. अंगेशही त्याच्यासोबत जाऊ लागला. काही दिवस अमन माळीसोबत कटिहारमध्ये राहिल्यानंतर, अमनने त्याला अमृतसर येथील एका मोठ्या शेतकऱ्याकडे कामावर ठेवले. तेथून मिळणारा पगार अमन माळी घेत असे.

ट्रक ड्रायव्हरच्या मदतीने पोहोचला घरी - अंगेशने दिलेल्या माहितीनुसार, गेल्याकाही दिवसांपासून अमन माळी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र हळूहळू त्याला त्याचे कुटुंब आणि संपूर्ण भूतकाळ आठवला होता आणि त्याला लवकरच घरी  पोहोचायचे होते. गेल्या आठवडाभरापूर्वी त्याने आझमगड जिल्ह्यातील एका ट्रक ड्रायव्हरला आपली संपूर्ण कहाणी सांगितली. यावर ट्रकचालकाने त्याला आझमगडला पोहोचवले. तो येथून ट्रकनेच बलिया जिल्ह्यातील बेलथरा येथे पोहोचला. यानंतर याच जिल्ह्यातील मणियार पोलिस ठाण्यात गेला. मणियार पोलिसांनी अंगेशचे म्हणणे ऐकून घेत त्याला पोलीस ठाण्यात बसवले आणि त्याचा फोटो व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने गावातील सर्पंचाला पाठवला. 

कुटुंबीयांनी मानले देवाचे आभार - मुलाची माहिती मिळताच अंगेशचे कुटुंबीय मणियार पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे अंगेशने आई कमलावती देवी आणि काकू संभलवती देवी यांना पाहताच ओळखले. यनंतर अंगेश त्याच्या घरी गेला. जवळपास 15 वर्षांनंतर अंगेश घरी परतल्याचे पाहून त्याच्या दारात लोकांची गर्दी होऊ लागली. 

हा संपूर्म दैवी चमत्कार असल्याचे मानत लोक देवाचे आभार मानत आहेत. अंगेशने सांगितले की, तो आता सर्वांना ओळखू लागला आहे, त्याला हळू हळू सर्व घटना आठवत आहेत. अंगेशची आई कमलावती यांनी सांगितले की, तो त्याच्या बालपणीच्या मित्रांना आणि शिक्षकांनाही ओळखू लागला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसFamilyपरिवारJara hatkeजरा हटके