शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कवठे यमाई परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

सात घरे फोडली : ५० हजारांचा ऐवज लंपास कवठे येमाई : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गावठाणात रविवारी पहाटेस चोरट्यांनी धुमाकूळ घालत बंद घरांना लक्ष करीत सात ठिकाणी घरफोड्या केल्या. काही मौल्यवान ऐवजासह सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. मुख्य गावठाणातच घरफोड्या झाल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले ...


सात घरे फोडली : ५० हजारांचा ऐवज लंपास
कवठे येमाई : कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गावठाणात रविवारी पहाटेस चोरट्यांनी धुमाकूळ घालत बंद घरांना लक्ष करीत सात ठिकाणी घरफोड्या केल्या. काही मौल्यवान ऐवजासह सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
मुख्य गावठाणातच घरफोड्या झाल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध लावून बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरांना बाहेरून कड्या लावत गोंधळी आळीतील दिलीप रेणके, रज्जाक मोमीन, ग्रामपंचायत जवळ रहात असलेले सिंडिकेट बँकेचे विकास अब्दुले, बी. के. मोमीन, कवठेकर, बाबूराव रोकडे, पोखरकर यांची बंद घरे फोडून घरातील कपाटे व साहित्याची उलथापालथ करीत मौल्यवान वस्तू व रोख रकमेसह सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
दरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास हनुमान मंदिर चौकात असणार्‍या सोनाराच्या दुकानाची कुलपे तोडण्याचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. यामुळे चोरट्यांनी मोटारसायकलींवरून पळ काढला. काही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार दोन मोटारसायकलींवरून सुमारे सहा चोरटे आल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस नाईक बाळकृष्ण साबळे व अन्य तीन पोलीस कर्मचारी २० मिनिटांतच घटनास्थळी पहाटे हजर झाले. आज दिवसभरात ठसेतज्ज्ञ व श्वान पथकही आले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास टाकळी हाजी पोलीस करीत आहेत.

फोटो ओळ-कवठे येमाई येथे पहाटेच्या सुमारास झालेल्या घरफोड्यांची पाहणी करताना सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व पोलीस कर्मचारी.