शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

ते' गोमांस नव्हतेच!

By admin | Updated: December 29, 2015 12:41 IST

संपूर्ण देशात वादळ निर्माण करणार्‍या दादरी हत्याकांडात बळी गेलेल्या मोहम्मद अखलाक याच्या घरातील रेफ्रिजिरेटरमध्ये सापडलेले मटण गायीचे नव्हेतर बकर्‍याचे होते, असे स्पष्ट झाले आहे

पशुवैद्यकाचा अहवाल : दादरीचा हकनाक बळी

नवी दिल्ली : संपूर्ण देशात वादळ निर्माण करणार्‍या दादरी हत्याकांडात बळी गेलेल्या मोहम्मद अखलाक याच्या घरातील रेफ्रिजिरेटरमध्ये सापडलेले मटण गायीचे नव्हेतर बकर्‍याचे होते, असे स्पष्ट झाले आहे.उत्तर प्रदेश सरकारने अखलाकच्या घरातून जप्त केलेले मटण तपासणीसाठी पशुवैद्यकीय विभागाकडे पाठविले होते. या विभागाने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून त्यात हे मटण गायीचे नाहीतर बकर्‍याचे होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गेल्या २९ सप्टेंबरला संतप्त जमावाने गोमांस सेवनाच्या अफवेनंतर अखलाक आणि त्याच्या कुटुंबीयांवर सशस्त्र हल्ला केला होता. या हल्ल्यात अखलाक मृत्युमुखी पडला तर त्याचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. पीडित कुटुंबाने हे गोमांस नसल्याचे जीवतोडून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. गावातील एका मंदिरात अखलाकच्या कुटुंबाने घरात गोमांस साठवून ठेवले असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर हे हत्याकांड घडले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी स्थानिक भाजपा नेत्याच्या मुलासह डझनावर लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गेल्या आठवड्यात ग्रेटर नोएडामधील न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात याप्रकरणी १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात भाजपा नेत्याचा मुलगा विशाल राणा याचाही समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)