शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'जय श्रीराम' घोषणा ऐकून भडकले, अयोध्येहून परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याची दिली धमकी; उडाला गोंधळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 19:42 IST

...यावर ट्रेनमधील काही प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी आरोपींना पकडून रेल्वे पोलीस दलाच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात न घेतल्याने जमलेल्या लोक आणखी संतप्त झाले.

अयोध्येहून परतणाऱ्या ट्रेनला आग लावण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात बेंगलोर पोलिसांनी धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपावरून तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही विशेष ट्रेन यात्रेकरूंना घेऊन अयोध्येहून म्हैसूरला परतत होती. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8.40 च्या सुमारास संबंधित तीन आरोपी ट्रेनच्या दुसऱ्या बोगीत चढले होते. यावेळी भाविकाने ‘जय श्री राम’ अशी घोषणा दिल्यानंत, आरोपींनी ट्रेन जाळण्याची धमकी द्यायला सुरुवात केली. यावर ट्रेनमधील काही प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी आरोपींना पकडून रेल्वे पोलीस दलाच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात न घेतल्याने जमलेल्या लोक आणखी संतप्त झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची महिती पसरताच भाजपचे शेकडो कार्यकर्त्ये आणि समर्थक रेल्वे स्थानकावर जमा झाले. त्यांनी तिन्ही आरोपींच्या अटकेची मागणी केली. पिस्थिती चिघळत असल्याचे पाहून बेल्लारीचे पोलीस अधीक्षक बीएल श्रीहरिबाबू काही पोलीस स्थानकांतील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रेल्वे स्थानकात पोहोचले. 

श्रीहरिबाबू म्हणाले, 'आम्ही या घटनेसंदर्भात होसपेट येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 295A (धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने दुर्भावनापूर्ण कृत्य), 504 (जाणुनबुजून अपमान करणे), 506 (जीवे मारण्याची धमकी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच 2 आरोपींचा शोध सुरू आहे.'

काँग्रेस अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे : भाजप नेते -भाजप नेत्यांनी संबंधित घटनेचा निषेध केला आहे. तसेच केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही काँग्रेसवर थेट आरोप केला आहे. 'व्होट बँकेसाठी काँग्रेस अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे. अशा धमक्या देणाऱ्यांच्या पाठीत लाथा घालायला हव्यात,' असे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या एका महिन्यात तब्बल 60 लाख भाविकांनी घेतले रामललांचे दर्शन -अयोध्येतील राम मंदिरात रामलला विराजमान होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 22 जानेवारी 2024 रोजी रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली. पहिल्या दिवशी केवळ प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनाच राम ललांचे दर्शन घेण्याची परवानगी होती. यानंत 23 जानेवारीपासून सर्वांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. तेव्हापासून येथे दर्शनासाठी भक्तांच्या रांगा दिसत आहेत. 23 जानेवारीलाच जवळपास 5 लाख भाविकांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले. तर गेल्या एका महिन्यात तब्बल 60 लाख भाविकांनी रामललांचे दर्शन घेतले असून एकूण 25 कोटी रुपयांहूनही अधिकचे दान केले आहे. हे दान मंद‍िर पर‍िसरातील दान-पात्र आणि दान काउंटरवर प्राप्‍त झाले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेKarnatakकर्नाटकRam Mandirराम मंदिरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपा