शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ भगिनींच्या मदतीसाठी सरसावले हात

By admin | Updated: November 26, 2015 03:29 IST

वृद्धापकाळात विपन्नावस्थेत जगणाऱ्या येथील सखूबाई व सरूबाई मडके या निराधार भगिनींच्या संघर्षमय जीवनावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच त्यांच्या मदतीसाठी राज्यभरातून अनेक हात पुढे आले आहेत.

श्रीगोंदा (अहमदनगर) : वृद्धापकाळात विपन्नावस्थेत जगणाऱ्या येथील सखूबाई व सरूबाई मडके या निराधार भगिनींच्या संघर्षमय जीवनावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच त्यांच्या मदतीसाठी राज्यभरातून अनेक हात पुढे आले आहेत.श्रीगोंदा येथील सप्रेवाडीत सरूबाई व सखूबाई एका छोट्या पडक्या खोलीत राहतात. तेथे ना वीज ना इतर व्यवस्था. ‘लोकमत’ने त्यांची व्यथा मांडताच टाकळी ढोकेश्वरच्या फिनिक्स युवा प्रतिष्ठानने त्यांना दरमहा एक हजार, अमरावतीच्या जानराव घोगड, शिवाजी खोडदे (ढवळपुरी) यांनी ५०० रुपये भोजन भत्ता देण्याचे जाहीर केले. श्रीगोंदा येथील नवले मेजर यांनी पाच हजार, अ‍ॅड. कृष्णा घावटे यांनी एक हजार तर शिवाजी खोडदे यांनी ५०० रुपयांची रोख मदत दिली. येथील डॉ. अनिल घोडके यांनी वृद्ध भगिनींना वैद्यकीय सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला. श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली, तर माजी नगरसेविका अनिता औटी व सतीश पोखर्णा यांनी दरवर्षी प्रत्येकी ५० किलो धान्य देण्याची व्यवस्था केली आहे. पुणे येथील सुरेखा जंगले-शेंद्रे यांनी स्वेटर्स पाठविले आहेत. (प्रतिनिधी)‘नाम’कडून दखल ‘लोकमत’मधील बातमी वाचून अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याही मनाला वेदना झाल्या. त्यांनी ‘नाम’चे सचिव राजाभाऊ शेळके यांना मडके भगिनींची माहिती मागवून मदत करण्यासाठी सूचना दिल्या. नगरच्या डॉ. राजेंद्र धामणे यांनी माउली प्रतिष्ठानमध्ये भगिनींना आसरा देण्याची तयारी दर्शविली आहे.देवच भेटले! थोरली बहीण सखूबाई आजारी पडली. आजारपणामुळे १० हजारांचे कर्ज झाले. कर्ज कसे फेडावे, याची चिंता होती. ‘लोकमत’मध्ये आमचा फोटो आला. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा पेपर पाहिला. दुसऱ्या दिवशी मोठी माणसं आमच्या पडक्या घराकडे आली. मदतीचा हात दिला आणि वाटलं, जगात आपलं कोणी तरी आहे. आम्हाला देवच भेटले, अशी भावना सरूबाई यांनी व्यक्त केली.