लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : काश्मीरमध्ये गेली ३७ वर्षे पेटलेला दहशतवादाचा वणवा केवळ तीन दहशतवाद्यांचा ‘हिशेब’ झाल्यास कायमचा शांत होऊ शकतो. विश्वास बसत नाही? पण हे सत्य आहे. सध्या काश्मीरमध्ये जो दहशतवाद सुरू आहे, त्यासाठी हे तीन अतिरेकी कमांडर जबाबदार आहेत. हे तिघेही सध्या पाकिस्तानच्या छत्रछायेखाली आहेत. भारताने अनेक वेळा पाकिस्तानला दिलेल्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्यांची नावे अग्रक्रमावर आहेत.
पोलिसांचे म्हणणे आहे की, जर पाकने या तिघांना भारताच्या ताब्यात दिले, तर काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येईल. या तिघांविरोधात काश्मीरमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. काही प्रकरणांमध्ये त्यांचा थेट सहभाग आहे, तर काहींमध्ये अप्रत्यक्ष.
हेच ते तिघे दहशतवादी
सईद सलाहुद्दीन : हा मूळचा काश्मिरी आहे. १९८७ मधील निवडणुकीत तो उमेदवार होता. निवडणुकीतील कथित गैरप्रकारांविरोधात त्याने हत्यार उचलले आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख बनला. मास्टर अहसान डारच्या अटकेनंतर तो कमांडर झाला आणि नंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन बसला. सईद सलाहुद्दीन याच्यावर जम्मू-काश्मीरचे माजी
मसूद अजहर : १ ऑक्टोबरला काश्मीर विधानसभेबाहेर घडवण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यात ४६ लोक मारले गेले होते. या हल्ल्यासाठी मसूदला जबाबदार मानले जाते.
हाफिज सईद : हा कधीही काश्मीरमध्ये आला नाही, पण त्याचा गट लश्कर-ए-तय्यबा येथे सक्रिय आहे. त्याच्याच इशाऱ्यावरून काश्मिरात दहशतवादी कारवाया सुरू असतात.