शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडे ना नेता, ना नीती, अमित शाह यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 4:16 PM

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मध्य प्रदेशातल्या शाजापूरमध्ये एका जनसभेला संबोधित केलं आहे. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस खोटी आश्वासनं देऊन मध्य प्रदेशमध्ये सत्ता हस्तगत करू पाहते आहे.

भोपाळ- भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मध्य प्रदेशातल्या शाजापूरमध्ये एका जनसभेला संबोधित केलं आहे. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेस खोटी आश्वासनं देऊन मध्य प्रदेशमध्ये सत्ता हस्तगत करू पाहते आहे. आम्ही मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढवतो आहोत. परंतु काँग्रेसचा मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण आहे ?, या लोकांकडे राज्यासाठी कोणताही नेता तर नाहीच अन् साधी नीतीही नाही, असंही अमित शाह म्हणाले आहेत.शिवराज सरकारनं शेतकऱ्यांना जास्त कर्ज दिलं अन् कमी व्याज वसूल केलं. मध्य प्रदेशातील सर्व; गावांना रस्त्यांनी जोडण्याचं काम शिवराज सिंह चौहान सरकारनं केलं आहे. काँग्रेसच्या शासनकाळात धर्मांतरण आणि गोरखधंदाच सुरू होता, अशी टीकाही अमित शाह यांनी केली आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हा ते मध्य प्रदेशातील रस्ते अमेरिकेतल्या रस्त्यांसारखे असल्याचे म्हणाले होते. अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते चांगले आहेत. मी वॉशिंग्टन विमानतळावर उतरल्यानंतर कारने जो प्रवास केला, त्यातून माझ्या हे लक्षात आले, असं ते म्हणाले होते. अमेरिकेतील एखाद्या रस्त्याच्या अनुभवातून तेथील सर्वच रस्त्यांविषयी सरसकट हे विधान त्यांनी केलं होते.एक खरं आहे की अमेरिकेतील अन्य राज्यांपेक्षा वॉशिंग्टनमधील रस्ते काहीसे वाईट आहेत. तेही सर्व नव्हे, तर काही भागांतील. तिथलं प्रशासनही ते मान्य करतं. ते का वाईट आहेत, याच्या मुळात जायचं कारण नाही. पण मध्य प्रदेशातील रस्ते देशातील अन्य राज्यांपेक्षा चांगले असले तरी ते अतिशय उत्तम आहेत, असं नाही. शिवाय मध्य प्रदेशातील काही रस्ते तर भलतेच खराब आहेत. त्यामुळेच शिवराज सिंह चौहान यांच्या या विधानावर सोशल मीडियावर टीका झाली. अनेकांनी तर त्यांची टिंगल करताना मध्य प्रदेशातील काही रस्त्यांचे फोटोही टाकले आहेत. एक रस्ता तर पाण्यात बुडाल्याने मुख्यमंत्र्यांना त्यांचे सुरक्षा कर्मचारी उचलून नेत आहेत, असाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Amit Shahअमित शाहMadhya Pradeshमध्य प्रदेश