शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

हत्याकांड... लाल डायरी... ईडी अन्..., 'या' चार मोठ्या कारणांमुळं राजस्थानात गेहलोतांचा टांगा पलटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 17:51 IST

भाजप पुन्हा एकदा 5 वर्षांनंतर राज्यात सत्तेवर येताना दिसत आहे. 

राजस्थान विधानसभा निवडणूक-2023 चे निकाल येत आहेत. हे निकाल पाहता, भारतीय जनता पक्ष राजस्थानात संपूर्ण बहुमतासह सरकार स्थापन करताना दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे जादूगर म्हणवल्या जाणार्‍या अशोक गेहलोतांचा टांगा पलटी झाला आहे. महत्वाचे म्हणजे, या विधानसभा निवडणुकीत हत्या, लाल डायरी आणि ईडी सारखे मुद्दे विशेष चर्चेत राहिले आणि भाजपनेही या मुद्द्यांचे आपल्या प्रचारासाठी भांडवल केले. परिणामी आता भाजप पुन्हा एकदा 5 वर्षांनंतर राज्यात सत्तेवर येताना दिसत आहे. 

खरे तर, राजस्थान निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार, लाल डायरी, मोदींची गॅरंटी, महिलांवरील अत्याचार आणि कायदा व सुव्यवस्थेसारखे मुद्दे उचलले. तर अशोक गेहलोत सरकारनेही या वर्षात आरोग्य विम्याची मर्यादा 50 लाख करण्याबरोबरच आणि स्वस्तातल्या सिलेंडरसह अनेक आश्वासने देत डावपेच खेळले. मात्र त्या सर्वांवर, लाल डायरी, भ्रष्टाचार, कायदा आणि सुव्यवस्था आदी मुद्दे भारी पडले.

लाल डायरी प्रकरण -  खरे तर राजस्थानच्या राजकारणात लाल डायरीचा मुद्दा नवा नाही. बऱ्याच दिवसांपासून यची चर्चा सुरू आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत, या मुद्द्याचे जबरदस्त भांडवल केले. एवढेच नही, तर राजस्थान सरकारमधील बरखास्त मंत्री राजेंद्र गुढा यांनी, या याडरीत आमदारांच्या घोडेबाजारीचा संपूर्ण कच्छा-चिठ्ठा असण्याचाही दावा केला  होता. यासंदर्भात बोलताना, "लाल डायरीची पानं जसजशी खुली होत आहेत, तस-तशी जादूगराची चिंता वाढत आहे. काँग्रेस सरकारने पाच वर्षांत आपले पाणी, जंगल आणि जमीन कशी विकली? राज्यातील अवैध खाण कामाचे कनेक्शन कुणापर्यंत पोहोचले आहे? हे कुणापासूनही लपून राहिलेले नाही," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

गटबाजी -याशिवाय राजस्थानात गटबाजीही बघायला मिळाली. सीएम अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद कुणापासूनही लपलेला नाही. याचा परिमाण राज्यातील पक्षाच्या कार्यकत्यांवर तर झालाच, पण जनतेतही चुकीचा संदेश गेला. खरे तर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या दोघांमध्येही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि आमच्यात सर्व काही सुरळित आहे आम्ही सोबत आहोत, असा संदेश देण्याचाही प्रयत्न केला. मात्र याचा परिणाम निवडणूक निकालावर होताना दिसला नाही.

कन्हैयालाल हत्याकांड -राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपने उदयपूरच्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलला आणि गेहलोत सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरे तर, राज्य जिंकायचे असेल, तर सर्वप्रथम मेवाड जिंकावे लागते, असे बोलले जाते आणि याच मारवाडमध्ये उदयपूर येते. भाजपने टाकलेल्या कन्हैया कुमार हत्या प्रकरणाच्या या ट्रॅपमध्ये अशोक गेहलोतही पुरते अडकले.

पेपर लिक प्रकरण आणि ईडीची एंट्री -पाच राज्यांत निवडणुका होत असताना दोन राज्यांमध्ये ईडीची एन्ट्रीही झाली. राजस्थानात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि काँग्रेस उमेदवार ओमप्रकाश हुडला यांच्या घरावर पेपर लीक प्रकरणात ईडीने छापा टाकला. निवडणूक प्रचारात काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला. अशोक गेहलोत यांनी प्रत्येक पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. मात्र याचा फायदा भाजपलाच मिळताना दिसला. 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसRajasthanराजस्थानBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक