इंडिया आघाडीचे ७ खासदार लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करु शकणार नाहीत; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 09:30 PM2024-06-25T21:30:40+5:302024-06-25T21:33:37+5:30

Lok Sabha Speaker Election: लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

these 7 india alliance mp would not be vote in lok sabha speaker election know reason | इंडिया आघाडीचे ७ खासदार लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करु शकणार नाहीत; कारण काय?

इंडिया आघाडीचे ७ खासदार लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करु शकणार नाहीत; कारण काय?

Lok Sabha Speaker Election: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अनेकविध मुद्द्यांवरून इंडिया आघाडीचे खासदार एनडीए सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. संसदेच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. यातच लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. एनडीएकडून ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेस खासदार के.सुरेश यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, सपा आणि काँग्रेसच्या ७ खासदारांना या निवडणुकीत सहभागी होता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 

लोकसभा अध्यक्षपदासाठी २६ जून रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि काँग्रेसकडून सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. आत्तापर्यंत फक्त दोन वेळा संसदेत लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली आहे. १९५२ ची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदावर सहमती न झाल्यामुळे निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर आता ही निवडणूक होणार आहे. 

७ खासदार लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करु शकणार नाहीत

तृणमूल, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या या सात खासदारांनी अद्याप खासदारकीची शपथ घेतली नाही. त्यामुळे हे सात जण निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू शकत नाही, असे सांगितले जात आहे. त्यात काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर, तृणमूल काँग्रेसचे खासदार दीपक अधिकारी, शत्रुघ्न सिन्हा आणि हाजी नूरुल इस्लाम यांचा समावेश आहे. याशिवाय बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष खासदार अभियंता रशीद आणि खदूर साहिब लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले अमृतपाल यांचीही नावे या यादीत आहेत. 

दरम्यान, उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधून निवडून आलेले लोकसभेचे खासदार अफजल अन्सारी यांनी संसदेत शपथ घेतली नाही. न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत शपथ घेण्यात आली नाही. समाजवादी पक्षाच्या खासदाराने कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अमृतपाल सिंग आसामच्या दिब्रुगड तुरुंगात बंद आहे. अमृतपालचे वकील गुरप्रीत सिंग संधू यांनी सांगितले की, त्यांनी खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी अमृतसर येथील जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. मात्र याबाबत कोणतेही उत्तर आले नाही.
 

Web Title: these 7 india alliance mp would not be vote in lok sabha speaker election know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.