स्टेट बँकेमध्ये होणार ८,000 जणांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 02:47 IST2020-01-04T02:47:21+5:302020-01-04T02:47:36+5:30
भरती क्लार्क या पदासाठी असून, महाराष्ट्रामध्ये खुल्या व राखीव प्रवर्गातील मिळून ८६५ पदे तर गोव्यातून १0 पदे भरली जातील.

स्टेट बँकेमध्ये होणार ८,000 जणांची भरती
नवी दिल्ली : स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये तब्बल ८ हजार जणांची भरती होणार आहे. भरती क्लार्क या पदासाठी असून, महाराष्ट्रामध्ये खुल्या व राखीव प्रवर्गातील मिळून ८६५ पदे तर गोव्यातून १0 पदे भरली जातील. कोणत्याही शाखेच्या पदवीधराला या नोकरीसाठी अर्ज करता येईल. वयाची अट २0 ते २८ इतकी आहे.
भरतीची आॅनलाइन प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २६ जानेवारी असून, अर्जासोबत शुल्कही भरावे लागणार आहे. बँकेने कस्टमर सपोर्ट व सेल्स या विभागांत कनिष्ठ सहायक पदे भरण्याचे ठरविले आहे. मात्र, एका व्यक्तीला एकाच राज्यातून अर्ज करता येणार आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची सर्व माहिती स्टेट बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.