शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:29 IST

डीके शिवकुमार यांच्या समर्थकांनी मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची मागणी केली आहे.

कर्नाटककाँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्रि‍पदावरून दोन गट पडल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि मुख्यमंत्री सिद्धारामय्या असे दोन गट आहेत. डीके शिवकुमार यांच्या समर्थकांनी अनेक महिन्यांपासून नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. दरम्यान, आता या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. डीके शिवकुमार यांचे समर्थक आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. डीके शिवकुमार यांच्यासह कर्नाटकचे एकूण १० आमदार दिल्लीत आहेत. 

दरम्यान, आता डीके शिवकुमार यांचे समर्थक आमदार इक्बाल हुसेन यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून त्यांना आश्वासन मिळाल्याचा त्यांनी दावा केला आहे. खरगे यांनी त्यांना सर्व काही ठीक होईल असे आश्वासन दिले आहे.

'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

आमदार हुसेन म्हणाले की, खरगे यांनी डीके शिवकुमार यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांशी चर्चा केली आहे. ते आता म्हणतात की ते या विषयावर हायकमांडशी चर्चा करतील आणि सर्व काही ठीक होईल. हुसेन पुढे म्हणाले की, खरगे यांनी सांगितले होते की त्यांना हायकमांडशी यावर चर्चा करावी लागेल आणि त्यानंतरच ते भाष्य करतील आणि त्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे. आतापर्यंत काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व या विषयावर मौन बाळगून आहेत. 

तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून डीके शिवकुमार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते या नाराजीतून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात अशा चर्चा आहेत.

अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता

कर्नाटकातील डीके शिवकुमार यांचे समर्थक आणखी काही आमदार दिल्लीला पोहोचू शकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर, नेतृत्वाच्या पहिल्या अडीच वर्षांनंतर सिद्धरामय्या बाजूला होतील, यामुळे शिवकुमार यांना संधी मिळेल, यावर एकमत झाले होते, असा दावा डीके शिवकुमार समर्थकांनी केला आहे. यामुळे आता कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Karnataka government change? DK Shivakumar's supporters active, MLAs in Delhi.

Web Summary : Karnataka Congress sees power struggle. DK Shivakumar's supporters demand leadership change, some MLAs are in Delhi seeking support. MLA Iqbal Hussein claims assurance from Kharge. Talks of a 2.5-year formula for CM position fuel speculation.
टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसBJPभाजपाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेsiddaramaiahसिद्धरामय्या