शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

कधी काळी १२ लाखांच्या उत्पन्नावर ३ लाख रुपये कर द्यावा लागत होता; मोदींनी केली नेहरु-इंदिरांच्या सरकारसोबत तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:11 IST

पंतप्रधान मोदींनी सत्तर वर्षांपूर्वीपासूनच्या करांसोबत आताच्या बजेटची तुलना केली आहे. या काळात सरकारचे उत्पन्न एवढे नव्हते की त्यांना जीएसटी सारखा अप्रत्यक्ष कर मिळत जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पातील १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील करमुक्तीचा मुद्दा दिल्ली विधानसभा निवडणुकीत मांडण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील आर के पुरममधील प्रचार सभेत कालच्या अर्थसंकल्पातील घोषणांची भारताच्या स्वातंत्र्य काळाशी तुलना केली आहे. नेहरु-इंदिरा गांधींच्या काळात १२ लाखांच्या पगारावर ३ लाख रुपये कर द्यावा लागायचा, आताच्या अर्थसंकल्पाकडे पहा, असे मोदींनी म्हटले आहे. 

पंतप्रधान मोदींनी सत्तर वर्षांपूर्वीपासूनच्या करांसोबत आताच्या बजेटची तुलना केली आहे. या काळात सरकारचे उत्पन्न एवढे नव्हते. तसेच एवढा पगारही किंवा करदात्याचे उत्पन्नही फार कमी, म्हणजे हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्याच लोकांचे होते. अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्सच रद्द करावा अशीही मागणी जनतेतून होत होती. परंतू, त्यांनी नवीन कर प्रणालीकडे लोकांनी वळण्यासाठी ही १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर करमुक्तीची घोषणा केली आहे. 

प्रचारसभेत पुढे मोदींनी आपवरही निशाना साधला. 'यावेळी दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीच्या 'आपत्ती' पक्षाने येथे ११ वर्षे वाया घालवली. मला राज्यातील दिल्लीतील लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी, अशी मी विनंती करतो', असे मोदी म्हणाले.  तुमच्या प्रत्येक समस्येचे आणि अडचणीचे निराकरण करण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन, अशी मी हमी देतो. सबबी सांगण्याऐवजी कामे करणारे सरकार आपल्याला स्थापन करावे लागणार आहे, अशी टीका मोदी यांनी केली. 

मतदानापूर्वीच झाडूच्या काड्या विखुरल्या जात आहेत. 'आपत्ती'मुळे जमिनीवरील लोक किती संतापले आहेत हे त्या लोकांना समजले आहे. यामुळे हे लोक सोडून जात आहेत. हा पक्ष दिल्लीतील लोकांच्या रोषाला इतका घाबरला आहे की दर तासाला वेगवेगळ्या घोषणा करत सुटला आहे. गेल्या १० वर्षांपासून ते त्याच खोट्या घोषणांवर पुन्हा पुन्हा मते मागत आहेत. आता आम्ही हे खोटेपणा सहन करणार नाही, असे मोदी म्हणाले. मोदींची हमी म्हणजे पूर्ततेची हमी. मोदी जे काही बोलतात ते करतात. गेल्या १० वर्षांत भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आली आहे. देशाची आर्थिक ताकद वाढत आहे. नागरिकांचे उत्पन्न वाढत आहे. जर परिस्थिती पूर्वीसारखीच असती तर देशाचे हे वाढते उत्पन्न घोटाळ्यांमध्ये गेले असते. काही लोकांनी ते हडप केले असते, अशी टीका मोदी यांनी केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूक