नीति आयोग/ जोड राज्यांमध्ये निकोप स्पर्धा असावी
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:27+5:302015-02-06T22:35:27+5:30
केंद्र - राज्य संबंध सुधारण्यासोबतच सांघिक चौकटीतील सहकार्याच्या आवश्यकतेवर मोदींनी भर दिला. राज्यांमध्ये निकोप स्पर्धा वाढीला लागण्याची गरजही प्रतिपादित केल्याचे जेटलींनी सांगितले. या बैठकीत प्रमुख योजनांची प्रभावीरीत्या अंमलबजावणी करण्यासह गरिबीचा स्तर कमी करण्यावरही चर्चा झाली. सरकार मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, जन-धन योजना, स्मार्ट सिटी यासारख्या महत्त्वाच्या योजनांच्या यशस्वीतेसाठी सवार्ेपरी प्रयत्न करीत आहे.

नीति आयोग/ जोड राज्यांमध्ये निकोप स्पर्धा असावी
क ंद्र - राज्य संबंध सुधारण्यासोबतच सांघिक चौकटीतील सहकार्याच्या आवश्यकतेवर मोदींनी भर दिला. राज्यांमध्ये निकोप स्पर्धा वाढीला लागण्याची गरजही प्रतिपादित केल्याचे जेटलींनी सांगितले. या बैठकीत प्रमुख योजनांची प्रभावीरीत्या अंमलबजावणी करण्यासह गरिबीचा स्तर कमी करण्यावरही चर्चा झाली. सरकार मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, जन-धन योजना, स्मार्ट सिटी यासारख्या महत्त्वाच्या योजनांच्या यशस्वीतेसाठी सवार्ेपरी प्रयत्न करीत आहे.गुंतवणूक वाढल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळेल अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील, असे सरकारला वाटते. या बैठकीला मोदी, जेटली यांच्यासह नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया, मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य विवेक देबराय, व्ही.के. सारस्वत, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा, योजना मंत्री राव इंद्रजितसिंग, आरबीआयचे माजी गर्व्हनर बिमल जालान, सुबीर गोकर्ण, अशोक गुलाटी, जी.एन. वाजपेयी उपस्थित होते.(विशेष प्रतिनिधी)