टँकरशिवाय पाणीच नाही
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:19+5:302015-02-18T00:13:19+5:30
औरंगाबाद : हर्सूल नवीन परिसराला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरला पैसे भरूनही वेळेवर पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांतून सुरू आहे.

टँकरशिवाय पाणीच नाही
औ ंगाबाद : हर्सूल नवीन परिसराला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरला पैसे भरूनही वेळेवर पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांतून सुरू आहे. महानगरपालिकेत हा परिसर जोडूनही जुन्या भागातील नागरिकांची तहान जेमतेम भागवली जात असून, उर्वरित नागरिकांना टँकरशिवाय पर्यायच राहिलेला नाही. नळाला मोटारी लावल्याने पाणी मिळणे कठीण झाले असून, अनेकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या भागातील बोअरने तळ गाठला असून, पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. टँकर अथवा पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहे. पूर्वी मनपाचे टँकर येत असत. आता ते टँकरही नवीन वसाहतीत शिरत नसल्याची तक्रार बहुतांश नागरिकांतून होत आहे. कामगार व अधिकारी या भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असून, पाणीपुरवठा अत्यल्प स्वरूपात होत असल्याने मुबलक पाण्यासाठी गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. नवीन वसाहतीची तर कल्पनाच न केलेली बरी, असे या भागातील अरुण सरोदे, पी. सी. वाघचौरे, दळवी आदींचे म्हणणे आहे.