शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स वर्करला पैसे न देणा-या ग्राहकावर बलात्काराचा गुन्हा नाही

By admin | Updated: October 12, 2016 19:51 IST

बंगळुरुतल्या एका 20 वर्षीय जुन्या बलात्काराच्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं तीन आरोपींना दोषमुक्त केले.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12- बंगळुरुतल्या एका 20 वर्षीय जुन्या बलात्काराच्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं तीन आरोपींना दोषमुक्त केले. सेक्स वर्करला पैसे देण्यास नकार देणा-या ग्राहकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष आणि न्यायमूर्ती अमिताभ राय यांच्यासमोर ही सुनावणी झाली. कोणत्याही महिलेकडून दाखल झालेल्या बलात्काराच्या तक्रारीला काही प्रमाणात पुरावे उपलब्ध झाले पाहिजेत. मात्र त्यांच्या जबाबाला पूर्ण सत्यही मानता येणार नाही. यासाठी काही प्रमाणात पुरावे उपलब्ध असावेत, असे न्यायमूर्ती म्हणाले आहेत. बंगळुरूतल्या 20 वर्षांपूर्वीच्या एका घरगुती काम करणा-या महिलेनं तीन जणांवर बलात्काराचा आरोप लावला होता. तिला एका रिक्षातून पळवून नेऊन एक गॅरेजमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं तिनं सांगितलं होतं. त्यानंतर कर्नाटक सरकारनं त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र त्या तीन आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाला आव्हान दिलं होतं. पीडित महिलेच्या मित्रानं मोठा गौप्यस्फोट करत महत्त्वपूर्ण जबाब देत पीडित महिला घरगुती काम करणा-या महिलेच्या आड सेक्स वर्करचं काम करते. त्यावेळी तिने आरोपींकडून सेक्सच्या मोबदल्यात पैशांची मागणी केली होती. मात्र ते पैसे देण्यास आरोपींनी नकार दिल्यानं तिने पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल केला, असं त्यानं सांगितलं होतं.