शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

अनेक बदलांनंतरही राजस्थानमध्ये पद्मावतचे प्रदर्शन नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 8:33 PM

सेन्सॉर बोर्डाच्या आदेशांनुसार अनेक बदल केल्यानंतरही पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनामधील अडथळे अद्याप संपलेले नाहीत. एकीकडे करणी सेनेने पद्मावत चित्रपटाबाबत तडजोडीची भूमिका फेटाळून लावलेली आहेत तर दुसरीकडे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही जनभावना विचारात घेता पद्मावत चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे.  

जयपूर - सेन्सॉर बोर्डाच्या आदेशांनुसार अनेक बदल केल्यानंतरही पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनामधील अडथळे अद्याप संपलेले नाहीत. एकीकडे करणी सेनेने पद्मावत चित्रपटाबाबत तडजोडीची भूमिका फेटाळून लावलेली आहेत तर दुसरीकडे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही जनभावना विचारात घेता पद्मावत चित्रपट राज्यात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे सांगितले आहे. त्याआधी राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी पद्मावत चित्रपट राजस्थानमध्ये प्रदर्शित होणार नसल्याचे सांगितले होते. पद्मावत चित्रपटातील इतिहासाबाबत राजस्थानमधील राजपुत समुदायाने आक्षेप घेतला होता. तसेच करणी सेनेने पद्मावत चित्रपटाबाबत सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, वाद वाढल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटात अनेक फेरबदल करण्यास सहमती दर्शवली होती. पद्मावत चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.काय आहेत बदल  केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाने (सीबीएफसी) संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटास यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे यासह एकूण पाच सुधारणा बोर्डाने सुचविल्या आहेत. हे बदल भन्साळी यांनी मान्य केले आहेत.सीबीएफसीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, २८ डिसेंबर रोजी बोर्डाच्या परीक्षण समितीची बैठक झाली. चित्रपटात काही बदल सुचवून यूए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आपला चित्रपट मलिक मुहंमद जायसी याच्या पद्मावत या काव्यावर आधारित असल्याचे भन्साळी यांनी संसदीय समितीसमोर सांगितले होते.राजपूत समुदायाच्या आक्षेपानंतर भन्साळी यांचा १५० कोटींचा हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटाविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली होती. सूचवलेले बदल चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ करा. ‘हा चित्रपट सती प्रथेचे उदात्तीकरण करीत नाही,’ अशी सूचना चित्रपटाच्या दाखवा.‘घुमर’ या गाण्यात बदल करा. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भांमध्ये योग्य बदल करा. चित्रपटाचा ऐतिहासिक घडामोडींची पूर्णपणे संबंध नाही, अशी सूचना चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवा असे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Padmavatiपद्मावतीcinemaसिनेमाRajasthanराजस्थानGovernmentसरकार