देशाला भ्रमित करणाऱ्या कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय पर्याय नाही- सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 13:21 IST2023-06-19T13:21:10+5:302023-06-19T13:21:23+5:30

'मोदी@9' अभियानांतर्गत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आयोजित विशाल जाहीर सभेत ते बोलत होते. 

There is no option but to remove Congress, which is misleading the country, from power, said that Minister Sudhir Mungantiwar | देशाला भ्रमित करणाऱ्या कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय पर्याय नाही- सुधीर मुनगंटीवार

देशाला भ्रमित करणाऱ्या कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय पर्याय नाही- सुधीर मुनगंटीवार

मंदसौर: सत्तेसाठी प्रत्येक वेळी खोटी आश्वासने देवून जातीधर्मात भेद निर्माण करणाऱ्याला कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल, असं आवाहन महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 'मोदी@9' अभियानांतर्गत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे आयोजित विशाल जाहीर सभेत ते बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभूतपूर्व योजना आणि संकल्पना आणून देशाला कीर्ती आणि गरिबांना सन्मान प्राप्त करुन दिला. कॉंग्रेसकडून मात्र  केवळ घोषणा आणि खोट्या प्रचाराच्या आधारावर समाजात आणि धर्मात तेढ निर्माण केल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केला. 

जगातील मोठमोठ्या राष्ट्रांचे प्रमुख आज आदराने नरेंद्र मोदी यांची सन्मानाने वाट बघतात ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. किसान क्रेडिट कार्ड, आयुष्यमान भारत, उज्वला गॅस, नारी सन्मान यांसारख्या कितीतरी योजना गरिबांसाठी आणून क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. पायाभूत सुविधांसह रस्ते सुधार, औद्योगिक प्रगती, शिक्षण, आरोग्य सुविधामध्ये भारत आज भक्कमपणे उभा असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: There is no option but to remove Congress, which is misleading the country, from power, said that Minister Sudhir Mungantiwar