'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:59 IST2025-12-19T11:55:17+5:302025-12-19T11:59:53+5:30

जास्त AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमधील थेट संबंध सिद्ध करणारा कोणताही निर्णायक डेटा उपलब्ध नाही, असे सरकारने संसदेत सांगितले आहे, जरी श्वसनाच्या आजारांमध्ये वायू प्रदूषण हा एक प्रमुख घटक म्हणून ओळखला गेला आहे. भाजप खासदार लक्ष्मीकांत बाजपेयी यांच्या प्रश्नाच्या उत्तरात पर्यावरण राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी ही माहिती दिली.

'There is no direct relationship between AQI and lung diseases...', Minister of State for Environment's reply in Rajya Sabha | 'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर

'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर

देशातील प्रदुषणावर राज्यसभेत पर्यावरण मंत्र्‍यांनी उत्तर दिले आहे. उच्च वायु गुणवत्ता निर्देशांक (AQI) पातळी आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध असल्याचे सिद्ध करणारा कोणताही ठोस डेटा उपलब्ध नाही. सरकारने गुरुवारी संसदेत ही माहिती उघड केली. राज्यसभेत लेखी उत्तरात, पर्यावरण राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी ही माहिती दिली. 

बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...

भाजप खासदार लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना कीर्ती वर्धन सिंह बोलत होते. त्यांनी विचारले होते की, दिल्ली एनसीआरमध्ये धोकादायक एक्यूआय पातळीच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने फुफ्फुसांच्या फायब्रोसिस होत असल्याचे अभ्यास आणि वैद्यकीय चाचण्यांमधून दिसून आले आहे का? हे सरकारला माहिती आहे का? हा आजार फुफ्फुसांची क्षमता कायमची कमी करतो.

लोकांना आजारांपासून वाचवण्यासाठी सरकारकडे काही उपाय आहे का?

दिल्ली-एनसीआरमधील रहिवाशांमध्ये फुफ्फुसांची लवचिकता चांगली एक्यूआय असलेल्या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत सुमारे ५० टक्क्यांनी कमी झाली आहे का? असा प्रश्नही भाजपा खासदारांनी केला. दिल्ली-एनसीआरमधील लाखो रहिवाशांना पल्मोनरी फायब्रोसिस, सीओपीडी, एम्फिसीमा, फुफ्फुसांची क्षमता कमी होणे आणि हळूहळू कमी होत जाणारी फुफ्फुसांची लवचिकता यासारख्या गंभीर आजारांपासून वाचवण्यासाठी सरकारकडे काही उपाय आहेत का?, असंही त्यांनी सांगितले.

पर्यावरण राज्यमंत्र्यांनी उत्तर दिले

पर्यावरण राज्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिले. मंत्र्यांनी सांगितले की, कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका, नोडल अधिकारी, संरक्षक स्थळे, आशा सारख्या आघाडीच्या कामगारांसाठी, महिला आणि मुलांसारखे असुरक्षित गट आणि वाहतूक पोलिस आणि महानगरपालिका कामगारांसारखे व्यावसायिकरित्या प्रदूषणाच्या संपर्कात असलेल्या लोकांसाठी वायू प्रदूषणाशी संबंधित मुद्द्यांवर विशेष प्रशिक्षण मॉड्यूल विकसित केले आहेत. 

वायू प्रदूषणाशी संबंधित आजारांवरील माहिती, शिक्षण आणि संप्रेषण साहित्य इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये विकसित केले आहे. याव्यतिरिक्त, राष्ट्रीय हवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमांतर्गत विविध असुरक्षित गटांसाठी विशेष IEC साहित्य विकसित केले आहे.

Web Title : AQI और फेफड़ों के रोगों में सीधा संबंध नहीं: सरकार

Web Summary : सरकार का कहना है कि उच्च AQI स्तर और फेफड़ों के रोगों में सीधा संबंध साबित करने के लिए कोई ठोस डेटा नहीं है। पर्यावरण मंत्री ने संसद में दिल्ली-एनसीआर में वायु प्रदूषण के प्रभाव पर चिंताओं के जवाब में यह जानकारी दी।

Web Title : No direct link between AQI and lung diseases: Government

Web Summary : Government states no concrete data proves a direct link between high AQI levels and lung diseases. The Environment Minister shared this in Parliament, responding to concerns about air pollution's impact on lung health in Delhi-NCR.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.