"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:28 IST2025-12-26T18:28:08+5:302025-12-26T18:28:35+5:30
'धर्म' या संकल्पनेचा उलगडा करताना भागवत म्हणाले, "धर्माकडे अनेक वेळा 'मजहब' म्हणून बघितले जाते. मात्र, धर्म म्हणजे, एखादा 'मजहब' नाही. धर्म म्हणजे सृष्टी ज्या नियमांनुसार चालते, त्याचे विज्ञान आहे.

"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विज्ञान आणि धर्म यांच्यातील संबंधांसंदर्भात मोठे विधान केले आहे. विज्ञान आणि धर्म यांच्यात कोणताही संघर्ष नाही, दोन्ही वेगवेगळ्या मार्गांनी एकाच सत्याचा शोध घेतात, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी तिरुपती येथे आयोजित 'भारतीय विज्ञान संमेलना'त बोलत होते.
'धर्म' या संकल्पनेचा उलगडा करताना भागवत म्हणाले, "धर्माकडे अनेक वेळा 'मजहब' म्हणून बघितले जाते. मात्र, धर्म म्हणजे, एखादा 'मजहब' नाही. धर्म म्हणजे सृष्टी ज्या नियमांनुसार चालते, त्याचे विज्ञान आहे. कुणी माने अथवा न माने, पण या नियमांच्या बाहेर कोणालाही कार्य करू शकत नाही." एवढेच नाही तर, "धर्मातील असंतुलन हे विनाशाचे कारण ठरते," असेही भागवत म्हणाले.
दोघांचेही अंतिम ध्येय 'सत्य शोधणे' हेच -
भागवत पुढे म्हणाले, "ऐतिहासिकदृष्ट्या वैज्ञानिक संशोधनात धर्माचे काहीही स्थान नाही, असे माणून विज्ञानाने धर्मापासून अंतर राखले. मात्र, हा दृष्टिकोन मूलभूतपणे चुकीचा आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात केवळ कार्यपद्धतीचा फरक आहे, दोघांचेही अंतिम ध्येय 'सत्य शोधणे' हेच आहे.
भारताने केवळ आर्थिक किंवा सामरिक महाशक्ती नव्हे, तर 'विश्वगुरू' बनण्याचे ध्येय ठेवावे -
पर्यावरणासारख्या जागतिक समस्यांचा उल्लेख करत सरसंघचालक म्हणाले, वैज्ञानिक ज्ञान जनतेपर्यंत त्यांच्या मातृभाषेतून पोहोचवणे आवश्यक आहे. भारताने केवळ आर्थिक किंवा सामरिक महाशक्ती बनण्याऐवजी 'विश्वगुरू' बनण्याचे ध्येय ठेवावे. भारत आपल्या वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून संपूर्ण मानवतेला नवी दिशा देऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेली व्यक्त केला.