शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'राम आणि राष्ट्राबाबत तडजोड नाही', पक्षातून काढल्यानंतर आचार्य प्रमोद यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2024 13:34 IST

काँग्रेसने ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून हकालपट्टी केली.

Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि पक्षविरोधी टिप्पणी केल्यामुळे काँग्रेसने आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. त्यांनी अलीकडेच अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. तसेच, या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल आपल्याच काँग्रेस पक्षातील नेत्यांवर टीका केली होती. आता पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर प्रमोद कृष्णम यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

प्रमोद कृष्णम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला. "राम आणि राष्ट्र, याबाबत तडजोड होऊ शकत नाही," अशी पोस्ट त्यांनी केली आणि या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनाही टॅग केले. विशेष म्हणजे, त्यांची पोस्ट रिट्विट करत कवी कुमार विश्वास यांनी विनय पत्रिकेतील तुलसीदासांच्या काही ओळी लिहिल्या. 

पक्षातून हकालपट्टी का केली?काँग्रेसचे म्हणणे आहे की, आचार्य प्रमोद कृष्णम यांना शिस्तभंग आणि पक्षाविरोधात वारंवार वक्तव्ये केल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली. मात्र, पक्षाने या निर्णयामागचे विशिष्ट कारण सांगितलेले नाही. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्षांनी प्रमोद कृष्णम यांची पक्षविरोधी विधाने आणि अनुशासनहीनतेच्या तक्रारींमुळे त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

दरम्यान, आचार्य प्रमोद यांचे म्हणणे आहे की, त्यांची पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट, त्यांना कल्की धामच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यासाठी होती. त्यांनी मुख्यमंत्री योगी यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासून आचार्य प्रमोद भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. 

कोण आहेत आचार्य प्रमोद कृष्णम?आचार्य प्रमोद कृष्णम यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लखनऊमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती, परंतु मोदी लाटेसमोर ते टिकू शकले नाहीत आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, आचार्य प्रमोद यांना 1 लाख 40 हजार मते मिळवण्यात यश आले. यापूर्वी त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक संभलमधून लढवली होती, पण येथेही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आचार्य प्रमोद हे याआधी काँग्रेसच्या उत्तर प्रदेश सल्लागार परिषदेचा एक भाग होते, जी प्रियांका गांधी वाड्रा यांना पक्षाच्या यूपी प्रभारी म्हणून मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. प्रियांका गांधी यांच्या जवळच्या नेत्यांपैकी ते एक असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश