‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 06:06 IST2024-09-17T06:04:33+5:302024-09-17T06:06:45+5:30
आफ्रिकेतून चित्ते भारतात आणल्यानंतरही अभयारण्याच्या २०२० ते २०३० साठीच्या व्यवस्थापन याेजनेत याचा कुठेही उल्लेख नसल्याचे उघड झाले आहे.

‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत
नवी दिल्ली : कुनाे अभयारण्यातील चित्ता प्रकल्पाबाबत मध्य प्रदेशच्या महालेखापालांनी केलेल्या लेखा परीक्षणात या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. या अहवालात राज्य आणि केंद्र सरकारच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे नमूद करून यातील अनेक कच्च्या दुव्यांवर बोट ठेवण्यात आले आहे.
आफ्रिकेतून चित्ते भारतात आणल्यानंतरही अभयारण्याच्या २०२० ते २०३० साठीच्या व्यवस्थापन याेजनेत याचा कुठेही उल्लेख नसल्याचे उघड झाले आहे.
४४ कोटी नेमके खर्च झाले कुठे ?
मुख्य वनरक्षक उत्तम शर्मा यांच्यानुसार, ही एक नियमित प्रक्रिया असून, अनेक टप्प्यांत ती पूर्ण केली जाते. लेखा परीक्षणात नमूद योजनेत चित्त्यांचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे २०२१-२२ ते २०२३-२४ या काळात या चित्ता प्रकल्पावर झालेला ४४.१४ कोटी खर्च व्यवस्थापनासाठी मंजूर योजनेशी ताळमेळ घालणारा नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
सिंहांचे काय झाले?
या अहवालानुसार, मुळात कुनो अभयारण्य हे आशियाई सिंहांसाठी अधिवासाचे देशातील दुसरे ठिकाण म्हणून निवडले गेले होते. परंतु, नोव्हेंबर २०२३ पर्यंत या सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत.