बंगालमधील 107 आमदार करणार भाजपात प्रवेश, मोठ्या नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 17:25 IST2019-07-13T17:24:50+5:302019-07-13T17:25:00+5:30
लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमतासह केंद्रातील सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपाने विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये व्यापक स्तरावर पक्षांतराची मोहीम हाती घेतली आहे.

बंगालमधील 107 आमदार करणार भाजपात प्रवेश, मोठ्या नेत्याचा दावा
कोलकाता - लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमतासह केंद्रातील सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपाने विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये व्यापक स्तरावर पक्षांतराची मोहीम हाती घेतली आहे. गोव्यात काँग्रेसच्या आमदारांचा गट पक्षात सामावून घेतल्यानंतर आणि कर्नाटकात सत्ताधारी आमदारांच्या बंडाला प्रोत्साहन दिल्यानंतर आता भाजपानेपश्चिम बंगालकडे मोर्चा वळवल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, सीपीएम आणि काँग्रेस या पक्षांचे मिळून सुमारे 107 आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपा नेते मुकुल रॉय यांनी सांगितले.
कोलकाता येते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला. ''पश्चिम बंगालमधील सीपीएम, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे मिळून सुमारे 107 आमदार लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या संभाव्य आमदारांची यादी आम्ही तयार केली असून, हे आमदार आमच्या संपर्कात आहेत.''असे मुकुल रॉय यांनी सांगितले.
Mukul Roy, BJP in Kolkata: 107 West Bengal MLAs from CPM, Congress and TMC will join BJP. We have their list prepared and they are in contact with us pic.twitter.com/SJ48v5WHMW
— ANI (@ANI) July 13, 2019
मे महिन्यात आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत यश मिळवले होते. पश्चिम बंगालमधून भाजपाचे 18 खासदार निवडून आले होते. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये असलेली संभाव्य संधी पाहून भाजपाने तृणमूल काँग्रेसला थेट आव्हान देण्यास सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये भजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक घटना घडत आहेत.