'राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही लॉर्ड नाहीत. मी खासदार आहे आणि कायदा हातात घेत नाही', असे म्हणत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना पुन्हा एकदा डिवचलं. हिंदी-मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवर खासदार दुबेंनी टीका केली होती. महाराष्ट्राबाहेर या आपटून आपटून मारू असे ते म्हणाले होते. याचबद्दल आता त्यांनी नव्याने भाष्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ललकारणारं विधान केले आहे.
वाचा >>"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
आपटून आपटून मारू, असे म्हणण्याची काय गरज होती? असा प्रश्न खासदार निशिकांत दुबे यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना निशिकांत दुबे म्हणाले, "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही मोठे लॉर्ड साहेब नाहीत. मी खासदार आहे आणि कायदा हातात घेत नाही."
राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक मारतील -दुबे
याच प्रश्नावर पुढे बोलताना खासदार निशिकांत दुबे म्हणाले, "पण जेव्हा केव्हा हे (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) बाहेर जातील (महाराष्ट्राबाहेर). तिथले नागरिक... मग ज्या कोणत्या राज्यात जातील, तिथे त्यांना आपटून आपटून मारतील", असे म्हणत खासदार दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचलं.
दुबेंनी आधी ठाकरे बंधूंबद्दल काय म्हटलं होतं?
निशिकांत दुबे यांनी यापूर्वीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना महाराष्ट्रावरही टीका केली होती.
"तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? तिथे टाटा आहे, बिर्ला आहे, रिलायन्स आहे. कोणाचेही महाराष्ट्रात प्रकल्प नाहीये. तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात? तुम्ही कोणता कर भरत आहात? तुम्ही जर बॉस आहात, तर चला बिहारला. चला उत्तर प्रदेशला. तामिळनाडूला चला. तुम्हाला आपटून आपटून मारू", असे निशिकांत दुबे यांनी म्हटले होते.