शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"…तर मी खासदारकीचा राजीनामा देईन", राहुल गांधींवरील धक्काबुक्कीच्या आरोपामुळे पप्पू यादव संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:35 IST

MP Pappu Yadav : या प्रकरणात राहुल गांधी यांची भूमिका सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन, असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून बुधवारी संसदेत याचे पडसाद उमटले. यावरून आजही(गुरुवारी) गदारोळ सुरु आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाचे खासदार पोस्टर आणि बॅनर्स घेऊन संसद परिसरात पोहोचले, तर दुसरीकडे विरोधक खासदारांनीही पोस्टर आणि बॅनर्स घेऊन निदर्शने सुरू केली.

यावेळी धक्काबुक्की झाली. ज्यात दोन खासदार जखमी झाले. या संपूर्ण धक्काबुक्कीसाठी भाजप राहुल गांधींना जबाबदार धरत आहे. त्यामुळे पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांची भूमिका सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन, असे पप्पू यादव यांनी म्हटले आहे.

पप्पू यादव म्हणाले, मी 7 वेळा खासदार झालो आहे. असे वातावरण मी आजपर्यंत पाहिले नव्हते. हा राडा झाला तेव्हा राहुल गांधी सभागृहात गेले होते, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणाव कमी व्हावा म्हणून मी त्यांना परत आणले. भाजप नेते निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींना गुंड म्हटले. तसेच, राहुल गांधींनी धक्का दिला तर भाजप व्हिडिओ का दाखवत नाही? या प्रकरणात राहुल गांधींचा हात असेल तर मी खासदारकीचा राजीनामा देईन, असे पप्पू यादव यांनी सांगितले.

गुन्हा दाखल करण्याबाबत पप्पू यादव म्हणाले की, भाजपचे लोक आपल्या हायकमांडला खूश करण्यासाठी खटला दाखल करत आहेत. तसेच, नेहमी खोट्याची मदत घेतली जात आहे. आज संसद परिसरात भाजप खासदार प्रताप सारंगी यांना झालेल्या दुखापतीत राहुल गांधींचा हात नाही. त्यावेळी ते संसदेत उपस्थित होते. भाजपा खासदार प्रताप सारंगी आपल्या या दुखापतीचे खोटे बोलत आहे, तो आयसीयूमध्ये झोपून राजकारण करत आहे, असे पप्पू यादव म्हणाले.

राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोपदरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष संसद परिसरात निदर्शने करत आहेत. तर यावेळी सत्ताधारी पक्षाचे खासदार सुद्धा पोस्टर आणि बॅनर्स घेऊन संसद परिसरात पोहोचले. यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाParliamentसंसदlok sabhaलोकसभाAmit Shahअमित शाह