लग्न समारंभात चोरी
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:21+5:302015-01-23T01:05:21+5:30
बालिकेने लांबविली पर्स

लग्न समारंभात चोरी
ब लिकेने लांबविली पर्सनागपूर : लग्नसमारंभात एका बालिकेने दिल्लीतील एका महिलेची पर्स लंपास केली. सावरकरनगर चौकातील पराते सभागृहात बुधवारी रात्री ही घटना घडली. शंकरन तिरुमली स्वामी (वय ५६, रा. सुभाषखंड, गिरीनगर, नवी दिल्ली) हे सहपरिवार लग्नाला आले होते. लग्नसमारंभ सुरू असताना त्यांची पत्नी स्टेजच्या बाजूला बसून होती. सायंकाळी ६ ते रात्री ७.३० च्या सुमारास एका बालिकेने नजर चुकवून त्यांची पर्स लंपास केली. या पर्समध्ये २० हजारांचे दोन मोबाईल, सोनसाखळी, अंगठी, रोख ३२०० तसेच अन्य चीजवस्तू असा एकूण ७८,२०० चा ऐवज होता. शंकरन तिरुमली स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.-----