वादानंतर गर्लफ्रेंडला खांद्यावर घेऊन पळू लागला तरुण; विचित्र घटनेनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 17:56 IST2024-02-19T17:53:26+5:302024-02-19T17:56:12+5:30

तरुणाने थेट प्रेयसीला खांद्यावर उचललं आणि तो तिथून पळत सुटला.

the young man started running with his girlfriend on his shoulder After the argument video viral | वादानंतर गर्लफ्रेंडला खांद्यावर घेऊन पळू लागला तरुण; विचित्र घटनेनं खळबळ

वादानंतर गर्लफ्रेंडला खांद्यावर घेऊन पळू लागला तरुण; विचित्र घटनेनं खळबळ

प्रेमप्रकरणातून बिहारमधील समस्तीपूर इथं एक विचित्र घटना घडली आहे. रस्त्यावर बोलत असताना झालेल्या वादानंतर प्रियकराने प्रेयसीला थेट खांद्यावर उचलून नेण्याचा प्रयत्न केला. हे दृष्य पाहून घटनास्थळी उपस्थित असणारे लोकंही बुचकळ्यात पडले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, समस्तीपूर परिसरात राहणाऱ्या तरुण-तरुणीचे इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाचे सूर जुळले. दोघेही मागील वर्षभरापासून एकमेकांशी बोलत होते. मात्र काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणीने सदर तरुणाशी बोलणं बंद केलं. यातून मार्ग काढण्यासाठी तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटायला बोलावलं. मात्र या भेटीतही त्यांच्यातील भांडण काही मिटायचं नाव घेत नव्हतं. त्यानंतर तरुणाने थेट प्रेयसीला खांद्यावर उचललं आणि तो तिथून पळत सुटला. याचवेळी तिथं उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद करत याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, या व्हिडिओत दिसणारा तरुण हा भारतीय लष्करात कार्यरत असून तो सध्या सुट्टीवर आला असल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


 

Web Title: the young man started running with his girlfriend on his shoulder After the argument video viral