नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:59 IST2025-12-20T15:58:12+5:302025-12-20T15:59:25+5:30
नियुक्ती पत्र देताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुस्लीम तरुणी सरकारी नोकरीत रुजू होण्यासाठी आलीच नाही.

नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
बिहारमध्ये हिजाब प्रकरणावरून राजकारण तापले आहे. एका कार्यक्रमात वेगवेगळ्या पदांसाठीचे नियुक्ती पत्र वाटप करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुस्लीम तरुणीचा हिजाब खेचला होता. त्यावरून बरीच टीका सुरू असून, त्या तरुणीबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. डॉक्टर नुसरत परवीन असे त्या तरुणीचे नाव असून, प्राथमिक आरोग्य केंद्रात तरुणी रुजूच झाली नाही.
डॉक्टर नुसरत परवीन यांची नियुक्ती सबलपूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आलेली आहे. आज त्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती होती. पण, डॉक्टर रुजू होण्यासाठी आल्याच नाहीत.
सबलपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. विजय यांनी सांगितले की, सकाळपासून ५ ते ६ नवीन लोक रूजू झाले आहेत. जे लोक रुजू झाले आहेत, त्याचे पत्र जिल्हा आरोग्य कार्यालयातून आले आहेत. नुसरत परवीन यांचेही नाव यादी आहे. पण, आतापर्यंत त्याचे पत्र प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेले नाही. त्या आज रुजू होणार आहेत की नाही, याबद्दल मला कल्पना नाही, असे ते म्हणाले.
वाद कसा सुरू झाला?
बिहारची राजधानी पटनामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी १२८३ आयुर्वेदिक डॉक्टरांना नियुक्ती पत्राचे वाटप केले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, बिहारचे मंत्री विजय कुमार चौधरी आणि आरोग्य मंत्री मंगल पांडे हेही उपस्थित होते.
याच कार्यक्रमात नियुक्ती पत्राचे वाटप करताना नितीश कुमार यांनी डॉ. नुसरत परवीन यांचा हिजाब खाली खेचला होता. यावरूनच वाद सुरू झाला होता.