शांत झोपेसाठी जग खर्च करते ५५० अब्ज डॉलर; झोप पूर्ण करा अन् तुमच्या मेंदूतील कचरा बाहेर फेका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 10:08 IST2026-02-19T10:06:39+5:302026-02-19T10:08:21+5:30

केवळ झोपेची औषधेच नव्हे, तर गाद्या, उश्या, स्लीप ट्रॅकर्स, स्मार्ट वॉच आणि व्हाइट नॉईज मशीन यांचाही समावेश आहे. धक्कादायक म्हणजे, २०२५ पर्यंत जगभरात झोपेच्या औषधांचा आणि सप्लिमेंट्सचा बाजार ८८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

The world spends $550 billion on restful sleep; get enough sleep and throw out the garbage from your brain | शांत झोपेसाठी जग खर्च करते ५५० अब्ज डॉलर; झोप पूर्ण करा अन् तुमच्या मेंदूतील कचरा बाहेर फेका

शांत झोपेसाठी जग खर्च करते ५५० अब्ज डॉलर; झोप पूर्ण करा अन् तुमच्या मेंदूतील कचरा बाहेर फेका

नवी दिल्ली : आजच्या युगात मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक असलेल्या ‘झोपे’ने मोठ्या जागतिक बाजाराचे रूप घेतले. ज्याला ‘स्लीप इकॉनॉमी’ असे म्हटले जात आहे. विविध संस्थांच्या अहवालानुसार, २०२४-२५ मध्ये जागतिक स्लीप इकॉनॉमीचा आकार ५५० अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाला आहे. यामध्ये केवळ झोपेची औषधेच नव्हे, तर गाद्या, उश्या, स्लीप ट्रॅकर्स, स्मार्ट वॉच आणि व्हाइट नॉईज मशीन यांचाही समावेश आहे. धक्कादायक म्हणजे, २०२५ पर्यंत जगभरात झोपेच्या औषधांचा आणि सप्लिमेंट्सचा बाजार ८८ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

भारतीय शहरांची स्थिती व अर्थव्यवस्थेवर परिणाम

भारतातील शहरी भागातील सुमारे ६१ टक्के प्रौढ नागरिक रात्री ७ तासांपेक्षा कमी झोप घेतात. अपुऱ्या झोपेमुळे कर्मचारी आपल्या कार्यक्षमतेच्या केवळ ८० टक्केच वापर करू शकतात.

जर ६ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांनी आपली झोप ७ तासांपर्यंत वाढवली, तर जागतिक अर्थव्यवस्थेत सुमारे २२६ अब्ज डॉलरची भर पडू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला. झोप पूर्ण न झालेले लोक चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे नुकसानही होते.

Web Title : शांतिपूर्ण नींद पर दुनिया का 550 अरब डॉलर खर्च; नींद पूरी करें, कचरा निकालें

Web Summary : वैश्विक 'नींद अर्थव्यवस्था' 550 अरब डॉलर से अधिक, जिसमें दवाएं, गैजेट शामिल हैं। भारत में 61% शहरी लोग 7 घंटे से कम सोते हैं, जिससे उत्पादकता प्रभावित होती है। अधिक नींद से वैश्विक अर्थव्यवस्था में 226 अरब डॉलर की वृद्धि हो सकती है।

Web Title : World spends $550 billion on sleep; prioritize sleep for brain detox.

Web Summary : The global 'sleep economy' exceeds $550 billion, including medications, gadgets. 61% of urban Indians sleep under 7 hours, impacting productivity. More sleep could boost the global economy by $226 billion, preventing poor decisions.