महिलेच्या डोक्याला झाली होती जखम, मलमपट्टी करताना डॉक्टरांनी कापसाच्या जागी चिकटलं कंडोमचं पाकीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 00:17 IST2022-08-21T00:16:43+5:302022-08-21T00:17:02+5:30
Health News: मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यातील सरकारी आरोग्य केंद्रामध्ये बेफिकीरीचा भयावह नमुना दिसून आला. येथे एक वृद्ध महिला डोक्यावर झालेल्या जखमेवर उपचार करून घेण्यासाठी आली होती.

महिलेच्या डोक्याला झाली होती जखम, मलमपट्टी करताना डॉक्टरांनी कापसाच्या जागी चिकटलं कंडोमचं पाकीट
भोपाळ - मध्य प्रदेशमधील मुरैना जिल्ह्यातील सरकारी आरोग्य केंद्रामध्ये बेफिकीरीचा भयावह नमुना दिसून आला. येथे एक वृद्ध महिला डोक्यावर झालेल्या जखमेवर उपचार करून घेण्यासाठी आली होती. यावेळी डॉक्टरांनी महिलेच्या डोक्यावरील जखमेची मलमपट्टी करताना कापसाच्या जागी कंडोमचं रिकामी पाकीट चिकटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर महिला अधिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात गेली असताना या घटनेचा उलगडा झाला आणि खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार मुरैना जिल्ह्यातील पोरसा परिसरातील धरमगड गावामध्ये राहणारी ७० वर्षीय महिलेच्या डोक्यावर वीट पडून जखम झाली होती. त्यामुळे होत असलेला रक्तस्राव थांबत नसल्याने तिचे नातेवाईक तिला घेऊन पोरसा रुग्णालयात पोहोचले होते. तिथे तिच्या जखमेवर मलमपट्टी करण्यात आली.
त्यानंतर सदर महिला अधिक उपचारांसाठी मुरैना येथील जिल्हा रुग्णालयात पोहोचली. तिथे तिच्या डोक्यावरील पट्टी काढली असता डॉक्टरांना धक्का बसला. या महिलेच्या जखम झालेल्या घावाच्या ठिकाणी कापसाऐवजी कंडोमचं रिकामी पाकीट चिकटण्यात आलं होतं.
या प्रकरणाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. प्रकरणच वाढताच मुरैनाचे एडीएम नरोत्तम भार्गव यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.