शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

होणाऱ्या जावयानंतर भावोजीसोबत पळालेली महिला अखेर आली समोर, म्हणाली, मी पळून गेले नाही तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:54 IST

Aligarh Women Relationship Case: होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेली अलिगड येथील महिला गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही महिला आता तिच्या भावोजीसोबत पसार झाल्याचा दावा तिच्यासोबत राहत असलेल्या जायवायने केला होता. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून जायवासोबत पत्नीप्रमाणे राहणारी ही महिला सर्वासमोर आली आहे.

मुलीच्या लग्नाला काही दिवस उरले असतानाच होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेली अलिगड येथील महिला गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही महिला आता तिच्या भावोजीसोबत पसार झाल्याचा दावा तिच्यासोबत राहत असलेल्या जायवायने केला होता. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून जायवासोबत पत्नीप्रमाणे राहणारी ही महिला सर्वासमोर आली असून, तिने आपण पळून गेले नव्हते, तर आपल्याला फसवण्यात आले, असा दावा करत सोबत पतीप्रमाणे राहत असलेल्या जावयावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सासू आणि जावयामधील ही प्रेमकहाणी वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. 

गेल्यावर्षी होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्यानंतर त्याच्याबरोबर पत्नीप्रमाणे राहिलेल्या महिलेवर तिच्यासोबत पतीप्रमाणे राहणाऱ्या जावयानेच गंभीर आरोप केले होते. ही महिला २ लाख रुपये आणि दागिने घेऊन भावोजीसोबत पळून गेली असा आरोप त्याने केला होता. या आरोपानंतर पोलीस ठाण्यात हजर झालेल्या या महिलेने सांगितले की, मी कुणासोबतही पळून गेलेले नाही. माझ्यावर जे आरोप केले जात आहेत. ते पूर्णपणे चुकीचे आहेत. सुरुवातीला सर्व काही चांगलं होतं. मात्र नंतर परिस्थिती बदलत गेली. राहुल (जावई) मला बंदीवानासारखं ठेवू लागला. तो मला कुठे येऊ-जाऊ देत नव्हता. एवढंच नाही तर मला गुंगीची औषधं द्यायचा. त्याने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. मी माझ्यासोबत जी रोख रक्कम आणि दागिने आणले होते, ते सर्व त्याने खर्च करून टाकले. आता माझ्यावरच उलटे आरोप करत आहे, असा दावा या महिलेने केला.ती पुढे म्हणाली की, मी खूप खटपट करून त्याच्या तावडीतून सुटून इथे आले आहे.  आता तो मला बदनाम करत आहे. आता मला न्याय हवा आहे. तसेच सत्य समोर आलं पाहिजे. माझ्याविरोधात एक कहाणी रचून सांगितली जात आहे. ती पूर्णपणे एकतर्फी आहे. तसेच मी चुकीचं वागले असते तर स्वत: पोलीस ठाण्यात आले नसते, असेही या महिले सांगितले.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशrelationshipरिलेशनशिपCrime Newsगुन्हेगारी