योगी सरकारचा लाचखोर कर्मचाऱ्यांना दणका; एका फोनवर महिलेला मिळाली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 16:15 IST2022-03-30T16:15:10+5:302022-03-30T16:15:54+5:30
Uttar Pradesh : हे प्रकरण मेरठच्या थाना लालकुर्ती भागातील भागीरथी आर्य कन्या इंटर कॉलेजशी संबंधित आहे, जिथे प्रवक्ता पदासाठी नियुक्ती देण्यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून महिला प्रवक्त्याला त्रास दिला जात होता.

योगी सरकारचा लाचखोर कर्मचाऱ्यांना दणका; एका फोनवर महिलेला मिळाली नोकरी
मेरठ : उत्तर प्रदेशातील योगी सरकार 2.0 लाचखोरीच्या बाबतीत आणखी कठोर झाले आहे. याचे पहिले उदाहरण मेरठमध्ये पाहायला मिळाले असून लाचखोरीच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यात आली आणि 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे, पीडितेच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तिच्या तक्रारीची त्वरित दखल घेतली आणि ती निकाली काढली, ज्यासाठी तिने 'धन्यवाद सीएम' म्हटले आहे.
प्रवक्ता पदावरील नियुक्तीसाठी लाच मागितली जात होती
हे प्रकरण मेरठच्या थाना लालकुर्ती भागातील भागीरथी आर्य कन्या इंटर कॉलेजशी संबंधित आहे, जिथे प्रवक्ता पदासाठी नियुक्ती देण्यासाठी गेल्या 4 महिन्यांपासून महिला प्रवक्त्याला त्रास दिला जात होता. एवढेच नाही तर रुजू होण्याच्या नावाखाली 3 महिन्यांच्या पगाराएवढी लाचही मागितली होती.
3 जणांविरुद्ध एफआयआर
महिला प्रवक्त्या वैतागल्या आणि त्यांनी सीएम पोर्टलवर आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर लाच प्रकरणात व्यवस्थापक, मुख्याध्यापक आणि लिपिक यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, आयुक्त आणि एसएसपी यांच्या मध्यस्थीनंतर या प्रकरणी लाल कुर्ती पोलिस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आता आरोपींविरुद्ध तपास सुरू करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांना म्हटले 'थँक्यू'
दुसरीकडे, महिला प्रवक्त्या ताबडतोब रुजू झाल्या आणि आता त्या महाविद्यालयात आपले काम चोख बजावत आहे. ज्यावेळी मीडियासोबत पीडित प्रवक्त्या संगीता सोलंकी यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की आपला मुख्यमंत्र्यांवर आधीपासूनच विश्वास आहे आणि समस्या त्वरित सुटली आहे. तसेच, यासाठी संगीता सोलंकी यांनी मुख्यमंत्र्यांना 'थँक्यू' देखील म्हटले आहे.