संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 07:53 IST2025-11-09T07:52:33+5:302025-11-09T07:53:12+5:30
Parliament Winter Session : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी शनिवारी केली. तर हे अधिवेशन कमी कालावधीचे असल्याबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान होणार असल्याची घोषणा केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी शनिवारी केली. तर हे अधिवेशन कमी कालावधीचे असल्याबद्दल विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
हे अधिवेशन तीन आठवड्यांचे असले तरी त्यात प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवसच असणार आहेत. १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन (एसआरआर) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर संसदेचे हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.